भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:19 AM2019-05-29T01:19:10+5:302019-05-29T01:19:19+5:30
तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे.
- रोहिदास पाटील
अनगाव : तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे. तालुक्यातील आदिवासीपाडे, वस्तीवाड्यांमध्ये नागरिकांना टंचाई भेडसावत असल्याचे चित्र असतानाच पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी कामवरी नदी कोरडी पडली आहे.
या नदीला अनेक छोटेमोठे ओहोळ जोडलेले आहेत. पिळझे गावच्या डोंगरपायथ्यापासून उगम पावलेल्या या नदीच्या तीरावर सुपेगाव, लामज, करंजवाडी, चावे, पंडास, निवली, रोहिने, सोनटक्के, खाडपे, कशेळी, विश्वभारती, कासपाडा, गोरसई, सैनिक वसाहत, कवाड, मडक्याचापाडा, बोरपाडा, शेलार, वाघिवली, आदी गावपाडे वसलेले आहेत. ही नदी येथील शेतकऱ्यांची जीवनरेखा आहे. उन्हाळ्यात या नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. येथील शेतकऱ्यांची ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. पावसाळ्यानंतर नदीतील पाणी कमी होते. नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकºयांच्या जनावरांना पाणी मिळत नाही.
या नदीतील पाण्याने शेलार येथील डाइंगला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नदी कोरडी पडते. मात्र, भिवंडी तहसील, भिवंडी पंचायत समिती आणि शेलार ग्रामपंचायत विभागाकडे यासंबंधी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यामागील कारण काय आहे, हे उमजलेले नाही.
भिवंडी पंचायत समिती लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. ठिकठिकाणी बंधाºयांचे काम केले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयांची दुरवस्था झाली आहे. बंधारे वाहून गेल्याने पाणी अडत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील काय, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. याबाबत शेतकºयांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे.
नदीपात्राची खोदाई करून त्यातून माती काढून खोली वाढवली, तर पाणीसाठा वाढेल आणि येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच शेतकºयांना दरवर्षी होणारा पाणीटंचाईचा त्रास वाचेल.
>नदीतील पाणी कमी झाल्याने नदी कोरडी पडली आहे. नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. नदीपात्राची खोदाई करून खोली वाढवल्यास पाणीसाठा वाढेल, याकडे शासनाने लक्ष द्यावे.
- प्रकाश पाटील, शेतकरी
>यासंबंधी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडून माहिती घेणार आहे.
- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी