कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:48 AM2018-11-17T04:48:15+5:302018-11-17T04:48:46+5:30

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक लाभ : भूमाफियांना बसणार वेसण

Kandla will now have a buffer zone | कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

googlenewsNext

नारायण जधव

ठाणे : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार भागांत खारफुटी अर्थात कांदळवनांवर होणारे अतिक्रमण आणि त्यांची कत्तल रोखण्याबाबत महापालिकांना येणाऱ्या अपयशाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जाग आलेल्या नगरविकास विभागाने महापालिकांसह नियोजन प्राधिकरणांनी आपल्या विकास आराखड्यात कांदळवनांची जागा बफर झोन म्हणून दर्शवावी, असे निर्देश दिले आहेत. या आदेशाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर येथील कांदळवनांना होऊन त्यावर भराव टाकून उत्तुंग इमारती बांधणाºया भूमाफियांसह रेतीमाफियांना वेसण बसणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका ८७/६ नुसार राज्य सरकारची कानउघाडणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी कांदळवनांची जागा नगररचना कायदा १९६६ च्या कलम ५४ नुसार बफर दर्शवण्यास सांगावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, जाग आलेल्या नगरविकास विभागाने १३ जून रोजी खास अध्यादेश काढून राज्यातील कांदळवने आणि त्यापासूनच्या ५० मीटर क्षेत्राचा परिसर बफर झोन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, विकास प्राधिकरणे आणि नियोजन मंडळांनी आपल्या विकास आराखड्यांमध्ये दर्शवावा, असे बजावले आहे.
भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ.कि.मी. होते. ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी. इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ.कि.मी.ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ती प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. या विस्तृत किनाºयाला अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्था (इको सिस्टीम) वास्तव्याला आहेत. जसे कांदळवने, कोरल्स, खडकाळ क्षेत्र, वाळूचे किनारे, दलदल. इ. किनारी आणि सागरी वातावरण फक्त विविध प्रकारची जैवविविधताच सांभाळत नाही, तर अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्थासुद्धा सांभाळते. ज्यावर समुद्रकिनारी राहणाºया अनेक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे किनारी आणि सागरी पर्यावरण सांभाळणे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कांदळवनांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये सर्व शासकीय कांदळवन जमिनींना राखीव वनांचा दर्जा देऊन स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती केली होती.

राज्यात ३० हजार हेक्टर कांदळवने

महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत मिळून ३०४ चौ.कि.मी.ची कांदळवने (कव्हर) आहेत. परंतु, कांदळवनांचे एकूण क्षेत्र (लॅण्ड) ३० हजार हेक्टरच्या आसपास आहे. आतापर्यंत १५ हजार ८८ हेक्टर शासकीय जमिनीवर तसेच १७७५ हेक्टर खाजगी क्षेत्रावरील कांदळवनांना ‘राखीव वने’ व वने म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

स्थानिक संस्थांकडून होतेय कांदळवनांवर अतिक्रमण
च्कोकणातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार, पनवेल यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आपल्या विविध विकास प्रकल्पांसाठी कांदळवनांवर सतत अतिक्रमण होत होते.

Web Title: Kandla will now have a buffer zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.