केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:57 AM2017-10-24T03:57:51+5:302017-10-24T03:57:58+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

Kangaroo 'Gangotri of corruption' flows in KDMC! | केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय

केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय

Next

प्रशांत माने 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. आधीच २० हून अधिक लाचखोर अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात अडकले असताना आणखी दोघांना सोमवारी जेरबंद करण्यात आले. मागील सहा महिन्यांत विविध लाच प्रकरणांमध्ये चार जण अडकल्याने केडीएमसी एकप्रकारे ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
क्षुल्लक कारणांसाठी कर्मचाºयांची लाच मागण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे २३ जण लाचखोरीच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यानंतरही कर्मचाºयांची खाबुगिरी कमी झालेली नाही. स्वाती गरूड या महिला अधिकाºयाला जुलैमध्ये झालेल्या अटकेमुळे या प्रकरणात महिलाही मागे नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याला काही महिने उलटत नाही तोच महापालिकेच्या ‘अ’ प्रभागातील कर विभागातील लिपिक श्रीधर रोकडे याला लाचखोरीच्या प्रकरणात नुकतीच अटक झाली. त्याच पुन्हा प्रभागातीलच आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे व कामगार विजय गायकवाड याला लाच प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात अन्य आरोग्य निरीक्षक संजय धात्रक याचाही समावेश आहे. नालेसफाईच्या कंत्राटाची बिले देताना दोघा निरीक्षकांनी कंत्राटदाराकडे ६० हजारांची लाच मागितली. परंतु, तडजोडीअंती ४० हजार ठरले. त्यौपकी दोघांनी प्रत्येकी २० हजारांची मागणी केली होती. ही रक्कम घेताना ठाकरे याला अटक झाली. या प्रकारामुळे केडीएमसीतील कंत्राटदारांना वेठीस धरले जात असल्याचे सिद्ध झाले.
मागील सहा महिन्यांत तिघेजण अडकल्याने पुन्हा पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या जाळ््यात अडकल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर याआधी घडल्या आहेत. दोन नगरसेवकही यात अटक झाले आहेत. लाचखोरांना कडक शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठिशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे याआधीही दिसली आहेत. या अभय देण्याच्या प्रवृत्तीमुळेच लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी सेवेत कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. याला लाचखोरीसंदर्भातील कायदेही एकप्रकारे तकलादू ठरत असल्याने अशा अधिकाºयांचे चांगलेच फावते. सेवेतील त्यांचा प्रवेश पुन्हा सुकर होत असल्याने ‘जाऊ तिथे खाऊ’ ही प्रवृत्ती कायम राहत आहे. वारंवार बदलणारे सरकारी निर्णय हे लाचखोरांच्या हिताचे असले तरी जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारी पदांपासून लाचखोरांना दूर ठेवण्याच्या राज्य सरकारच्या २०११ च्या निर्देशाकडेही हेतुपुरस्सर कानाडोळा केला गेल्याचे केडीएमसीत पहावयास मिळत आहे.
>अबतक पच्चीस
सोमवारची घटना पाहता आतापर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण २५ जण लाचखोरीच्या जाळ््यात अडकले गेले आहे. यात सुरेश पवार, सुनील जोशी, गणेश बोराडे, सुहास गुप्ते, दत्तात्रय मस्तुद, स्वाती गरूड या बड्या अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाचेच्या प्रकरणात अडकले गेल्यानंतरही लाचसत्र सुरूच आहे.
न्यायालयात
आज हजर करणार
लाचखोर आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे आणि कामगार विजय गायकवाड या दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली. दोघांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्य एक आरोपी आरोग्य निरिक्षक संजय धात्रक यालाही लवकरच अटक करू, असे चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Kangaroo 'Gangotri of corruption' flows in KDMC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.