ठाण्याच्या करण चाफेकरने डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले थ्रीडी प्रिंटरवर कोवेड मास्क 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 13, 2020 10:30 PM2020-04-13T22:30:00+5:302020-04-13T22:30:02+5:30

मास्कचा तुटवडला असल्याने ठाण्याच्या कारण चाफेकरने पुन्हा वापरण्यायोग्य कोवाड मास्क तयार केले आहेत. 

Karan Chafaker from Thane made a quad mask on 3D printers for doctors and police | ठाण्याच्या करण चाफेकरने डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले थ्रीडी प्रिंटरवर कोवेड मास्क 

ठाण्याच्या करण चाफेकरने डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले थ्रीडी प्रिंटरवर कोवेड मास्क 

Next
ठळक मुद्देकरण चाफेकरने डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले थ्रीडी प्रिंटरवर कोवेड मास्क डॉक्टर्स आणि पोलिसांसाठी बनविले मास्क पुन्हा वापरण्याजोगे प्लास्टिकचे आणि पारदर्शी फेस शिल्ड मास्क केले तयार

ठाणे : आपल्या जीवाची तमा न बाळगता नागरिकांच्या रक्षिततेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या आणि आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्ससाठी  ठाण्याच्या  करण चाफेकरने थ्रीडी  प्रिंटरवर कोवेड मास्क तयार केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण चाफेकर या युवकाने थ्रीडी प्रिंटरवर पुन्हा वापरण्याजोगे प्लास्टिकचे आणि पूर्ण चेहऱ्यालासुरक्षित ठेवणारे पारदर्शी फेस शिल्ड मास्क तयार केले आहे. करण सामाजिक जाणिवेतून हेकोवेड मास्क डॉक्टर्स आणि पोलिसांना देणार आहे. 

    कोरोनाने जगभरासह आपल्या राज्यातही थैमान घातले आहे. मुंबईत कोरोनाबधितांची संख्या वाढतच आहे. तुलनेने मास्क देखील कमी पडत आहे. आरोग्य सेवेत असणाऱ्या डॉक्टर्स आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी 24तास कार्यरत असणारे पोलीस यांच्यासाठी  करणने आपल्या युक्तीने थ्रीडी प्रिंटरवर मास्क बनविले आहे. फोल्डरच्या पारदर्शी शीट, फ्रेम आणि रबर बँड या साहित्यांचा वापर करून फेस शिल्ड मास्क करणने तयार केला आहे. या मास्क वरील फ्रेम त्याने थ्रीडी प्रिंटरवर तयार केली आहे. याचा फायदा असा कि या मास्कने पूर्ण चेहरा झाकला जातो. खोकताना किंवा शिकवताना चेहऱ्यावर उडत नाही. डोळे, नाक, कान, तोंड यांकडे हात जाऊ शकत नाही. हा मास्क हेल्मेट सारखा असून त्याने पूर्ण चेहरा सुरक्षित राहू शकतो असे करणने सांगितले. हा मास्क त्याने अवघ्या 20मिनिटांत तयार केला आहे. दिवसाला एका थ्रीडी प्रिंटरवर तो 10ते 15मास्क बनवत आहे. मास्कचा तुटवडा लक्षात घेता तो दुसरा थ्रीडी प्रिंटर बनवून त्यावरहि मास्क बनविणार आहे. पुन्हा वापरता येणारा पीएलए प्लास्टिक मास्क देखील तयार केला असून हा मास्क प्लस्टिक, मास्कचा तुकडा म्हणजेच फिल्टर आणि इलॅस्टिकचा यांचा वापर करून बनविला  आहे. साधारण मास्क वापरून झाल्यावर तो पूर्ण फेकून दिला जातो पण करणने तयार केलेल्या या मास्कला पूर्ण फेकावा लागणार नाही.  आठ तास हा मास्क वापरून झाला कि त्यातील फिल्टर टाकून दुसरे फिल्टर लावून तो मास्क पुन्हा वापरता येऊ शकतो अशी माहिती त्याने दिली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे सुरक्षित मास्क आहेत आणि ते पोलीस आणि डॉक्टर्सला देणार असल्याचे त्याने सांगितले.  

Web Title: Karan Chafaker from Thane made a quad mask on 3D printers for doctors and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.