कारगिल विजयदिनी ३० सिंधीबांधवांना नागरिकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:29 AM2019-07-27T00:29:07+5:302019-07-27T00:29:37+5:30

ठाण्यातील माजी सैनिक, वीरपत्नींना केले सन्मानित : नियोजन भवनमध्ये पार पडला सोहळा

Kargil Victory Day: Citizenship for Sindhis | कारगिल विजयदिनी ३० सिंधीबांधवांना नागरिकत्व

कारगिल विजयदिनी ३० सिंधीबांधवांना नागरिकत्व

Next

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी विसावा कारगिल युद्ध विजय दिन आणि माजी सैनिक संमेलन झाले. यावेळी जिल्ह्यातील ३० सिंधीबांधवांना भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्र ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आमदार गुरुमुख जगवानी यांच्या हस्ते देण्यात आले.

नियोजन भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हुतात्मा जवान स्मृती प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. या कार्यक्र मासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, माजी सैनिक संघटना आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले.

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वीरपत्नी मीरादेवी, सत्याराणा, बेबी जोन्ह सी, सुप्रिया सुधीर आंब्रे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. याप्रमाणेच कारगिल युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी कारगिल हुतात्मा जवानांना पुष्पहार आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजळ जाधव आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: Kargil Victory Day: Citizenship for Sindhis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.