ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 7, 2022 04:28 PM2022-09-07T16:28:42+5:302022-09-07T16:29:21+5:30

टिळक यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र अभ्यासावे, वाचावे आणि आपल्या मुलांपर्यंत पोहोचवावे असा सल्ला उपस्थित शिक्षकांना दिला. 

karmaveer award facilitated to senior educationist ashok tilak | ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान

Next

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : आदर्श विकास मंडळाच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि संस्थापकीय अध्यक्ष दिवंगत बी.बी मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक टिळक यांना "कर्मवीर पुरस्कार २०२२" बुधवारी केबीपी महाविद्यालयात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, भेटवस्तू,शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी टिळक यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र अभ्यासावे, वाचावे आणि आपल्या मुलांपर्यंत पोहोचवावे असा सल्ला उपस्थित शिक्षकांना दिला. 

पुरस्काराला उत्तर देताना टिळक म्हणाले की, बी. बी. मोरे यांच्याशी शिक्षण आणि त्यासंबंधित त्यांनी सुरू केलेले कार्य यानिमित्ताने त्यांच्याशी भेटी आणि चर्चा होत. हा पुरस्कार स्वीकारण्याचे ते ही एक कारण आहे. शिक्षकांनी कर्मवीरांनी सुरू केलेल्या शाळांना भेटी दिल्या पाहिजेत अशा शब्दांत मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रगती करणाऱ्या योजना शिक्षण संस्थांनी अंमलात आणल्या की त्या शिक्षणसंस्थेला जनमानसात मान्यता मिळते. पुर्वी शिक्षणाची साधने फळा आणि खडू होती. परंतू आता शिक्षकांच्या हातात विकसीत माध्यमे आली आहेत त्याचा परिणामकारक उपयोग आपण करतो का? याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. हल्ली शाळांमध्ये अनेक दिन साजरे होतात आणि तो दिन साजरा केल्याचे फोटो पाठविण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्या दिनापेक्षा फोटोवर जास्त लक्ष असते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. स्वच्छतेचा संस्कार मुलांमध्ये लहानपणापासून रुजविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी शिक्षकांनी प्रवृत्त करावे आणि तशी व्यवस्था दैनंदिन वेळापत्रकात केली पाहिजे. मुलांना चांगली सवय लागेल अशी व्यवस्था करता येईल का याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना, पालकांना दोष न देता शिक्षकांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षणात उभा आणि आडवा विचार अशा दोन पद्धती असतात या दोन पद्धतीने विचार केला तर शिक्षकांचा आत्मविश्वास विकसीत होईल असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला. आ. केळकर यांनी खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचवण्याचे काम टिळक सरांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी केले असल्याचे सांगताना शिक्षण हित, विद्यार्थी हित हेच राष्ट्रीय हित आहे हे विचार करण्याची दृष्टी शिक्षकांची असली पाहिजे. अनेक शाळांमध्ये शौचालये नसल्याचा उल्लेखही केळकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सचिन मोरे यांनी केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष मनोज शिंदे, टिळक यांच्या पत्नी आदी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन प्राचार्य संतोष गावडे यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन योगिता कुंभार यांनी केले. 

शिक्षण हे व्रत म्हणून टिळक सरांनी साकारले. शिक्षक या मर्यादीत रुपाला विस्तारीत रुप देता येते याचे उदाहरण म्हणजे टिळक सर. हा जीववनव्रती अशा स्वरुपाचा हा पुरस्कार आहे. पुर्वी शिक्षण संस्कृतती दिसत होती ती कमी होत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत कर्मवीर पुरस्काराचे पहिले मानकरी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. नरेंद्र पाठक यांनी आताच्या शिक्षण मंडळाची आव्हाने कठिण होत चालली आहे. या आव्हानात गुणात्मक पायवाट तयार करायची आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: karmaveer award facilitated to senior educationist ashok tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे