कसारा घाट 10 तास विस्कळीत, पोलीस प्रशासनावर ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:28 PM2019-08-06T16:28:41+5:302019-08-06T16:29:06+5:30
मुंबई नाशिक महामार्ग वरील विघ्न अजून ही कायम आहे. कसारा घाटातील जुना घाटात दरडी पडणे व रस्ता खचणे सुरु असतानाच नवीन घाटात देखील काही ठिकाणी तडे गेले
कसारा - मुंबई नाशिक महामार्ग वरील विघ्न अजून ही कायम आहे. कसारा घाटातील जुना घाटात दरडी पडणे व रस्ता खचणे सुरु असतानाच नवीन घाटात देखील काही ठिकाणी तडे गेलेत परिणामी मुंबई कडे येणारी व नाशिक कडे जाणारी वाहतूक नवीन घाटातून सुरु असताना मोठ्या प्रमाणावर ताण नवीन घाटावर पडला आहे अवजड वाहने, लहान कार यांची एकच गर्दी या नवीन घाटात होतं असताना आज पहाटे 2:30 मिनिटांनी नवीन कसारा घाटातील दोन ठिकाणी वळणावर तीन ते चार ट्रक, कन्टेनर, बंद पडल्याने सुमारे 10 तास महामार्ग वरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
महामार्ग विस्कळीत झाल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय भोये, महामार्ग घोटी टॅप चे अधीकारी सागर डगळे आपल्या कर्मचाऱ्या समवेत घाटात दाखल झाले परंतु घाटातील नाग मोडी वळणावर अवजड वाहने बंद पडल्याने व इगतपुरी च्या दिशेकडे व कसाराच्या दिशेकडे वाहनाच्या रांगा लागल्याने बंद गाड्या काढण्यासाठी क्रेन आणण्यास अडचणी निर्माण होत होत्या त्यात लहान गाड्या अस्ताव्यस्त घुसल्याने पोलीस प्रशासनास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
अखेर बंद असलेल्या जुन्या घाटातील दरडी काही प्रमाणात बाजूला करुन लहान गाड्या जुन्या घाटातून काढण्यात आल्या त्यानंतर पोलीस प्रशासनाने क्रेन साठी रस्ता तयार करीत कसेबसे क्रेन नवीन घाटात आणले व वळणावर बंद पडलेले वाहने हटवले तब्बल 8 ते 10 तासाच्या अथक परिश्रमांनंतर पोलीस प्रशासनास घाट सुरळीत करण्यात यश आले मात्र या दरम्यान पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्ये खुप हाल झाले. एकी कडे पाऊस तर एकीकडे घाटातील विघ्न यामुळे वाहनचालक व बस, कार मधील प्रवाशी घाटात अडकून पडल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.