कथोरे दिल्लीत, मी राज्यात ही अफवाच - कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:09 AM2018-08-15T03:09:02+5:302018-08-15T03:09:46+5:30
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे लोकसभा लढवण्यास तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत ही चर्चा चुकीची आहे.
बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे लोकसभा लढवण्यास तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत ही चर्चा चुकीची आहे. असा कोणताही विचार कथोरे अथवा मी करत नसल्याचे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
बदलापूर शहर भाजपाच्या वतीने ‘आमदार-खासदार आपल्या दारी’ कार्यक्र म राबवला. या अंतर्गत आमदार कथोरे व खासदार पाटील शहराच्या भागाभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने आमदार व खासदार यांच्याशी चर्चा करताना भाजपातील आमदार, खासदारकीच्या उमेदवार अदलाबदलाबाबत चर्चा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर पाटील यांनी मी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत तर आमदार कथोरे यांनी हसत हसत माझी अडचण होते का? असा सवाल करत या चर्चा अफवाच असल्याचे स्पष्ट केले. आमदार आणि खासदार दोन्हीही भाजपाचेच असतील असा दावाही त्यांनी केला.
विविध विकासकामांचे झाले भूमिपूजन
किसन कथोरे व कपिल पाटील यांच्या हस्ते नगरसेवक संजय भोईर व किरण भोईर यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा विजया राऊत, भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष संभाजी शिंदे, महिला शहराध्यक्षा मेघा गुरव आदींसह भाजपाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.