जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:51 AM2022-08-16T09:51:09+5:302022-08-16T09:51:40+5:30

जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे.

Katkari families Jawhar when government recognition? | जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

Next

- रवींद्र साळवे

मोखाडा : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे जव्हार तालुक्यातील आदिम ३३ कातकरी कुटुंबांकडे शासकीय ओळखच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे. या पाड्यावरील लोकसंख्या ६३७ आहे. तर कातकरी समाजाची ५५ घरे असून, २३० लोकसंख्या आहे. दशरथ तुळशीराम जाधव (वय २६) यांच्या कुटुंबात आई, पत्नी, एक बहीण आणि तीन मुली असा परिवार आहे. पण, या कुटुंबाकडे स्वतःची शेती नाही. आठ महिने स्थलांतरित होऊनच हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. 
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे या कुटुंबीयांकडे मतदान कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, जातीचा दाखलाच काय तर कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. यामुळे कोणत्याच योजना या कुटुंबापर्यंत पोहोचत नाहीत. हे एकच कुटुंब असे आहे असे नाही, तर अशी ३३ कुटुंबे तिथे आहेत, ज्यांच्याकडे अद्यापही कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. त्यामुळे हे लोक बेघर आहेत. यामुळे ही कुटुंबे स्थलांतरित होण्याच्या अगोदरच येथे कॅम्प आयोजित करून या कुटुंबांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी बविआचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी केली आहे.
इतर समाजापेक्षा अगदी वेगळी जीवनशैली जगणारा कातकरी बांधव कायमच गावकुसाबाहेर राहिला आहे. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरू झाल्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. रोजगारासाठी दिवाळी संपताच वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी  स्थलांतरित व्हावे लागते.

ढोरमेहनत अन् तुटपुंजी कमाई 

    वीटभट्टीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. 
    नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापणे, भट्टी रचणे आदी कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात. या बदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्यापुरते पैसे मिळतात.
    व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोरमेहनत अन् कमाई तुटपुंजी अशी स्थिती आहे.

Web Title: Katkari families Jawhar when government recognition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर