गणेश विसर्जनासाठी केडीएमसी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:01+5:302021-09-10T04:48:01+5:30
कल्याण : पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाटाची केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त ...
कल्याण : पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाटाची केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.
मनपा हद्दीत ६८ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे प्रकाश व्यवस्थेसाठी अडीच हजार हॅलोजन, तर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ६६ जनरेटर लावले आहेत. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विसर्जन आपल्या दारी हा उपक्रमासाठी प्रत्येक प्रभागांत गाडी फिरविली जाणार आहे. त्या गाडीवर पाण्याची टाकी असून, त्यात विसर्जन करता येईल. मागील वर्षी गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्ण वाढले होते. त्यामुळे ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोना नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे.
-------------------------