केडीएमसीकडून तरुणांचे लसीकरण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:49+5:302021-05-15T04:38:49+5:30
कल्याण : राज्य सरकारच्या सूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे, अशी ...
कल्याण : राज्य सरकारच्या सूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
आज, शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे शाळेतील लसीकरण केंद्रावर आणि डोंबिवलीतील क्रीडासंकुलातील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या केवळ दुसऱ्या डोसासाठी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी ६ ते ८ आठवड्यावरून १२ ते १६ आठवडे असा केला आहे. त्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असतील, अशा नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर मिळणार आहे.
-------------