होळीच्या तोंडावर वेतन थकलं, कडोंमपा परिवहन कामगारांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 03:41 PM2018-03-01T15:41:17+5:302018-03-01T15:41:17+5:30

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकले आहे.

KDMC transport workers Agitation | होळीच्या तोंडावर वेतन थकलं, कडोंमपा परिवहन कामगारांचे ठिय्या आंदोलन

होळीच्या तोंडावर वेतन थकलं, कडोंमपा परिवहन कामगारांचे ठिय्या आंदोलन

Next

डोंबिवली - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकले आहे. गुरुवारी (1 मार्च) होळी सणाच्या दिवशी कामगारांनी परिवहन सभापती संजय पावशे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. होळी सण कामगारांच्या कुटुंबीयांनी कसा साजरा करायचा असा संतप्त सवाल उपस्थित केला.  परिवहन कामगार कर्मचारी संघटना ही मान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांनी परिवहन सभापतीच्या दालनासमोर आज दुपारपासून ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. होळीची सुट्टी नसल्याने महापालिकेचे कामकाज आज सुरू होते. परिवहन सभापती पावशे हे दालनात येण्यापूर्वीच त्यांच्या दालनाबाहेर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. सरचिटणीस जाधव यांनी सांगितले की, कामगारांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आज होळीसारखा मोठा सण कर्मचा-यांच्या हातात पैसा नसल्याने त्यानी कसा साजरा करायचा.

त्याच्या घरात पुरणाची पोळी कशी बनेल असा प्रश्न उपस्थित केला. कामगारांचे पगार वेळेवर होत नाही. नेहमीच उशिराने होता. परिवहन कामगारांचे पगार झालेले नसले तरी कामगारांनी काम बंद आंदोलन केलेले नाही. दररोज परिवहनला साडे पाच लाखाचे उत्पन्न कामगार मिळवून देतात. कामगारांनी आज त्यांचे कर्तव्य बजाविल्यानंतर हे आंदोलन सुरू केले आहे. कामगारांना पगार मिळत नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे इशारा जाधव यांनी दिला आहे. परिवहन उपक्रमाला महापालिकेकडून सापत्न वागणूक दिली जाते. मूलभूत सोयी सुविधा कामगारांना उपलब्ध करुन दिल्या जात नाही. परिवहनमध्ये जवळपास 550 कामगार कार्यरत आहे. 1999 सालापासून कामगारांची थकीत देणी दिलेली नाहीत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवा म्हणून कामावर येतात. त्याच्या मोबदला कामगारांना दिला जात नाही. कामगारांचा आरोग्य विमा काढला जात नाही. हा उपक्रम चांगला चालावा.

कामगारांना पगार मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. 14 वर्षापासून कंत्रटी कामगार सात ते आठ हजार रुपये पगारावर काम करीत आहेत. अन्य परिवहन उपक्रमात चालक वाहकाला किमान 20 हजार रुपये पगार मिळतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कमी पगारावर कामगारांना राबवून घेतले जाते. कमी वेतनही वेळेवर दिले जात नाही. 
दरम्यान थकीत वेतन आणि कर्मचा-याच्या मागील फरकाची रक्कम 4 मार्चच्या आत मिळाली नाही तर परिवहन कामगार बेमुदत चक्का जाम आंदोलन 5 मार्च पासून करतील असा इशारा परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.

Web Title: KDMC transport workers Agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.