वीज खंडित होण्याचा फटका केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 02:57 PM2019-07-20T14:57:26+5:302019-07-20T14:57:31+5:30
डोंबिवली : मोहिली येथील पाणी पुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या एचटी लाईनमध्ये बिघाड झाल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ...
डोंबिवली : मोहिली येथील पाणी पुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या एचटी लाईनमध्ये बिघाड झाल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी वितरण विभागाला मोठा फटका बसला.
डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागात येणारे पाणी आलेले नाही. सकाळी 7.30 वाजता घटना घडली असून अजूनही महावितरणला फॉल्ट मिळालेला नाही. त्यामुळे फॉल्ट सापडल्यानंतर त्याची दुरुस्ती झाली की पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. संध्याकाळीही उशिरा काम झाल्यास पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता अधिकाऱ्यांनी सांगितले. काही नगरसेवकांनी त्यांच्या मोबाइल स्टेटसवर हा प्रकार ठेवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.