KDMC: शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पाणी पुरवठा राहणार बंद

By अनिकेत घमंडी | Published: October 4, 2023 02:29 PM2023-10-04T14:29:05+5:302023-10-04T14:34:19+5:30

KDMC News: टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील त्या फीडारच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होणार आहे.

KDMC: Water supply of Kalyan-Dombivli Municipal Corporation will remain closed on Friday | KDMC: शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पाणी पुरवठा राहणार बंद

KDMC: शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पाणी पुरवठा राहणार बंद

googlenewsNext

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली - महानगरपालिकेच्या १५० द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र नेतिवली ज.शु.के. व १०० द.ल.ली. मोहिली जलशुध्दीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथून विज पुरवठा केला जातो. टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील त्या फीडारच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होणार आहे.

त्यामुळे महापालिकेच्या १५० द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र नेतिवली ज.शु.कें. व १०० द.ल.ली. मोहिली जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण ग्रामीण विभाग टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे व डोंबिवली पूर्व व पश्चिम तसेच कल्याण पश्चिम विभागामधील भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनग, मिलींदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड व कल्याण स्टेशन परिसर या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरीकांनी पाण्याचा योग्य साठा करुन ठेवावा,सदर परिसरात शट डाऊनच्या दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Web Title: KDMC: Water supply of Kalyan-Dombivli Municipal Corporation will remain closed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.