केडीएमसीच्या बाबू गेनु शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटली सहलीची मजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:08 PM2018-02-24T17:08:02+5:302018-02-24T17:08:02+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी शेलार हे नेहमी खंबाळपाडा परिसरातील महापालिका शाळा क्र.७० बाबुगेनू शाळेची सहल नेत असत. त्यांचा सहलीचा वारसा आता नगरसेवक साई शेलार यांनी चालवला असून यंदाही १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळखांब येथिल आजा पर्वत येथे शाळेची सहल नेली होती.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी शेलार हे नेहमी खंबाळपाडा परिसरातील महापालिका शाळा क्र.७० बाबुगेनू शाळेची सहल नेत असत. त्यांचा सहलीचा वारसा आता नगरसेवक साई शेलार यांनी चालवला असून यंदाही १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळखांब येथिल आजा पर्वत येथे शाळेची सहल नेली होती.
त्या सहलीला प्राथमिक शाळेचे ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह माजी नगरसेविका शिल्पा शेलार या देखिल मुलांची काळजी घेण्यासाठी सहलीला गेल्या होत्या. मुलांनी तेथे दिवसभर खेळ, गप्पा, मस्ती, धम्माल केली. त्या पर्वताच्या परिसरात एक शाळा असून तेथिल ४०० विद्यार्थ्यांसह डोंबिवली खंबाळपाडा येथिल विद्यार्थ्यांनी एकत्रपणे सामुहिक भोजन केले. गोष्टी सांगितल्या. आणि पर्वताची स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. लहानग्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगत आरोग्य सांभाळणे आवश्यक असून आरोग्याची निगा कशी राखावी यासंदर्भात जनजागृती केली. सहलीला जातांना बसमध्ये गाणी, नाच यासह ऐतिहासीक गोष्टी सांगण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या सहलीचे विशेष आकर्षण झाले होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने मुलांना सहसा बाहेरगावी नेले जात नाही, पण मग अशा माध्यमातून मुलांमध्ये पर्यटनाची आवड निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे असे नानाविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न शिवाजी शेलार यांनी केला होता. तोच प्रयत्न यापुढे सुरु रहावा यासाठी साई शेलार, माजी नगसेविका शिल्पा शेलार यांनी सुरु ठेवल्याने समाधान असल्याची भावना परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. वडीलांचा वारसा पुढे चालु ठेवणे, त्यांनी दिलेला सामाजिक बांधिलकीचा मुलमंत्र जोपासण्याची ही संधी असल्याचे मत साई शेलार यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. सहलीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सूकता आणि परत आल्यावरचे समाधान यामधून समाधान मिळत असल्याची भावना भाजपाचे पूर्व मंडल सरचिटणीस राजू शेख यांनी व्यक्त केली.