केडीएमसीचे ई-गव्हर्नन्स कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:29 AM2018-04-05T06:29:42+5:302018-04-05T06:29:42+5:30

केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो.

 KDMC's eGovernance paper | केडीएमसीचे ई-गव्हर्नन्स कागदावरच

केडीएमसीचे ई-गव्हर्नन्स कागदावरच

Next

कल्याण - केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होतो. आता अत्याधुनिक साधने आल्याने पेपरलेस होणे गरजेचे आहे. त्यासाठी विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त प्रत्येक सदस्याला ई-मेलद्वारे पाठवल्यास महापालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने पेपरलेस होऊ शकतो, याकडे स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.
केडीएमसीच्या बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत हा विषय उपस्थित करण्यात आला. विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्त यांचे कागद नंबरनुसार जुळवण्यात अनेक शिपाई गुंतून राहतात. तसेच विषयपत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्तांचे बाड तयार होते. महापालिकेने झेरॉक्स मशीन घेण्याचा विषय या सभेत उपस्थित केला. त्यावेळी याविषयाकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. गोषवारा व इतिवृत्त हे सविस्तर असते. ते ई-मेलद्वारे पाठवावेत. त्याची सुरुवात माझ्यापासून करा, अशी मागणी म्हात्रे यांनी सभापती राहुल दामले यांच्याकडे केली.
वर्षाला झेरॉक्सद्वारे छायांकित प्रती काढण्यासाठी सात लाख ५० हजार पेपरचा वापर केला जात असेल, तर आपण किती तरी वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे वृक्षतोडीस आपण परवानगी देत नाही. एक झाड तोडण्याच्या बदल्यात पाच झाडे लावण्याची हमी घेतो. महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात हजारोंच्या संख्येत झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे किमान महापालिकेने ई-मेलचा वापर केल्यास सात लाख ५० हजार पेपरचा वापर टळू शकतो. त्यातून पर्यावरण संतुलनास मदत होऊ शकते, असे म्हात्रे म्हणाले.
यावेळी सदस्य रमेश म्हात्रे म्हणाले, केडीएमसी ही देशातील पहिली ई-गव्हर्नन्स महापालिका आहे. या प्रणालीचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जात आहे. असे असताना महापालिका पेपरलेस झालेली नाही.
विषय पत्रिका, गोषवारा आणि इतिवृत्ताच्या प्रतिसाठी साडेसात लाख कागदांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त महापालिकेचे विविध विभाग, १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. डोंबिवली विभागीय कार्यालय आणि महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयातही पेपरचा वापर केला जातो. तेथे वापरल्या जाणाºया पेपरविषयी सभेत कोणतीही वाच्यता केली नाही. तसेच त्याचा तपशील सचिवांनी दिला नाही. यासाठी लागणारा कागदही वर्षभराच्या आकडेवारीत जास्त असण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजही पेपरलेस झालेले नाहीत. त्यामुळे महापालिकेत पेनलेस कारभार नाही. काही पर्यावरणप्रेमी सदस्यांनी पेपरलेस कारभार व्हावा, असा विचार व्यक्त केला असला तरी अन्य सदस्यांनी त्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.

सूचनेची अंमलबजावणी आवश्यक

दोन्ही सदस्यांच्या मुद्यांचा विचार करून येत्या चार सभांची विषयपत्रिका सोडून गोषवारा, इतिवृत्त ई-मेलद्वारे पाठवल्यास कोणत्या सदस्यांना ते सोयीचे ठरणार आहे, तसे त्यांनी सचिव संजय जाधव यांना कळवावे. इतिवृत्त व गोषवाºयाच्या झेरॉक्स प्रती त्यांना दिल्या जाणार नाही. सगळ्या सदस्यांना ई-मेलची सवय लागणे एका झटक्यात शक्य नाही.

त्यामुळे हळूहळू या सूचनेची अंमलबजावणी करावी. सगळ्यांनाच टॅब अथवा मोबाइलवर इतिवृत्त व गोषवारा वाचणे शक्य नाही. सगळेच काही टॅक्नोसॅव्ही नसतात. पण, सूचना चांगली आहे. पर्यावरणपूरक आणि पर्यायावर संतुलनासाठी सूचनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत दामले यांनी मांडले.

Web Title:  KDMC's eGovernance paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.