धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:36+5:302021-06-03T04:28:36+5:30

कल्याण : कल्याण पश्चिमेतील छाया टॉकीजसमोरील मॉडर्न गेस्ट हाऊस या धोकादायक इमारतीवर महापालिकेने कारवाई करून इमारत जमीनदोस्त केली आहे. ...

KDMC's hammer on dangerous building | धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

Next

कल्याण : कल्याण पश्चिमेतील छाया टॉकीजसमोरील मॉडर्न गेस्ट हाऊस या धोकादायक इमारतीवर महापालिकेने कारवाई करून इमारत जमीनदोस्त केली आहे.

ही इमारत महापालिकेच्या मालकीची आहे. इमारत १९७६ साली बांधली होती. तळ अधिक तीन मजल्यांची ही इमारत होती. २०१३ मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित केले. तळमजल्यावरील ९ दुकाने महापालिकेने लीजवर दिली होती. गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निकाल महापालिकेच्या बाजूने लागला होता. त्यानंतर गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने गाळे खाली करण्याचे आदेश देऊन इमारत पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या पथकासह ही कारवाई केली गेली. महापालिकेचे १० कर्मचारी, १० पोलीस आणि एका केबल क्रशिंग मशीनच्या साहाय्याने ही कारवाई केली.

-----------------

Web Title: KDMC's hammer on dangerous building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.