डोंबिवलीत बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:49+5:302021-09-23T04:46:49+5:30
कल्याण : डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील तीन मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांनी बुधवारी हातोडा चालविला. बिल्डर विकास ...
कल्याण : डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील तीन मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांनी बुधवारी हातोडा चालविला. बिल्डर विकास राठोड आणि जागा मालक अशोक म्हात्रे यांनी उभारलेल्या या इमारतीवर प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी कारवाई केली. पोलीस, मनपा कर्मचारी, एक पोकलेन, चार कॉम्प्रेसर आणि दोन ब्रेकरद्वारे ही इमारत पाडण्यात आली.
‘ग’ प्रभागातील टावरेपाडा, नांदिवली येथील अक्षय सोलकर याने सात मजली इमारतीचे बेकायदा बांधकाम केले होते. या इमारतीवरही बुधवारी कारवाई करण्यात आली. तसेच ‘आय’ प्रभागातील आडीवली ढोकली गावठाण परिसरात जगदंब सिंग राणा यांनी चार मजली बेकायदा इमारत उभी केली होती. ही इमारतही जेसीबीद्वारे तोडण्यात आली. अधिकारी किशोर खुताडे, सविता हिले, संयज साबळे, सुखदेव धापोडकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली गेली.
-------------------