प्रवाशांच्या मदतीला केडीएमटी

By Admin | Published: July 6, 2017 06:02 AM2017-07-06T06:02:03+5:302017-07-06T06:02:03+5:30

नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी

KDMT to help passengers | प्रवाशांच्या मदतीला केडीएमटी

प्रवाशांच्या मदतीला केडीएमटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने कंबर कसली आहे. रिक्षाचालकांची अरेरावी मोडीत काढत केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड (रिक्षा स्टॅण्ड) ते मानपाडा रोडच्या जंक्शनपर्यंत (कल्याण-शीळ रोड) तीन बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कायमस्वरूपी ही बससेवा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.
डोंबिवली पूर्वेला स्थानकाबाहेरून शहरातील विविध भागांत जाण्यासाठी रात्री ८ नंतर रिक्षा मिळत नाहीत. पावसाळ््यात रस्त्यांवर कमी असलेल्या रिक्षा, खड्डे तसेच वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे रिक्षा स्टॅण्डवर पुरेसा रिक्षाच नसतात. मुजोर रिक्षाचालक अनेकदा भाडेही नाकारतात. त्यामुळे प्रवाशांचे नेहमीच त्यांच्याशी वाद होतात. या सगळ््या प्रकाराच्या निषेधार्थ प्रवाशांनी मागील आठवड्यात रिक्षा रोखून धरत संताप व्यक्त केला होता. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता रिक्षेला वाहतुकीचा सक्षम पर्याय काय, असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे. केडीएमटीच्या अधिकाधिक बस रस्त्यावर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड ते मानपाडा रोडअखेरपर्यंत बस सोडण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली. प्रायोगिक स्तरावर रविवार सायंकाळपासून या बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारपासून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांनी कायमस्वरूपी या मार्गावर बस सोडण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले.
रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी शहरात ठिकठिकाणी केडीएमटीची सेवा देणे हाच एक पर्याय आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. परिवहन सभापती संजय पावशे यांनी गंभीरे यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला असला तरी त्याची केडीएमटीत अद्याप त्याची रितसर नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मार्गावर कायमस्वरूपी बस चालवण्यासाठी केडीएमटी व्यवस्थापनाकडे नोंद असणे आवश्यक आहे. 

डोंबिवलीत रिक्षांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाचे गोविंद गंभीरे यांनी लक्षात आणून दिले. त्यानसार वस्तूस्थितीचा आढावा घेत दोन-तीन बसच्या सहा फेऱ्या सायंकाळी तीन तासांत होत आहेत. त्यातून सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ही सुविधा कायम देण्याचा विचार आहे.
- संजय पावशे,
सभापती, परिवहन समिती

Web Title: KDMT to help passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.