खबरदार! २० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 07:35 PM2017-07-30T19:35:06+5:302017-07-30T19:35:13+5:30

२० हजारांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा

khabaradaara-20-hajaaraanpaekasaa-adhaika-raokada-baalagalayaasa-acaarasanhaitaecaa-bhanga | खबरदार! २० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार? 

खबरदार! २० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार? 

Next

भाईंदर, दि. ३० - मीरा-भार्इंदर महापालिका निवडणूक काळात कोणत्याही व्यक्तीने २० हजारांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे फर्मानच प्रशासनाने भरारी पथकाला दिल्याने अजब निवडणूक प्रशासनाच्या या गजब फंड्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे.

यंदाची निवडणुक कॅशलेस व्यवहाराशी संबंधित आहे की काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. याच अनुषंगाने प्रशासनाने शनिवारी प्रभाग समिती सहा अंतर्गत नियुक्त केलेल्या स्टॅटिक सर्व्हलेंस टीमने (भरारी पथक) काशिमीरा येथील नीलकमल नाक्यावर एमएच-०४-एचडी-३८४८ या टेम्पोची झाडाझडती घेतली. त्यावेळी टेम्पो चालकाजवळ ११ लाख ४६ हजार ४१७ रुपयांची रोकड सापडली. ही रोकड सिगारेटच्या विक्रीतून मिळाल्याचा दावा चालकाकडून करण्यात आला. तरी देखील पथकाने चालकासह टेम्पोला काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची चौकशी अद्यापही सुरू असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास सानप यांच्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु, यंदाच्या पालिका निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीने २० हजारापेक्षा अधिक रोकड सोबत बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेच भंग ठरत असल्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसे फर्मानच निवडणूक प्रशासनाकडून बजावण्यात आल्याने यंदाच्या निवडणुकीतील प्रशासन कॅशलेस व्यवहाराचा अप्रत्यक्षपणे प्रचार करीत आहे की काय, असा प्रश्न मतदारांना पडू लागला आहे. त्यातच अत्यावश्यक खर्चासाठी २० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगायची झाल्यास निवडणूक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार का, असा संतप्त प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  

वरिष्ठ शिक्षक संपत मोरे : यंदाच्या पालिका निवडणुकीचे औचित्य साधून निवडणूक प्रशासन डिजिटल सरकारच्या कॅशलेस व्यवहाराचा प्रचार करीत असल्याचा प्रत्यय येत आहे. निवडणुक प्रशासनाने अशा प्रकारचा मोघलाई आदेश नागरीकांवर लादू नये. अन्यथा मतदानावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभाग समिती ६ मधील भरारी पथकाचे अधिकारी अविनाश जाधव : निवडणूक निर्णय अधिकारी अशोक मुंडे यांच्या आदेशानुसार २० हजारांपेक्षा अधिक रोकड आढळुन आल्यास आचारसंहितेचा भंग ठरत असल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसारच कारवाई केली जात आहे.

Web Title: khabaradaara-20-hajaaraanpaekasaa-adhaika-raokada-baalagalayaasa-acaarasanhaitaecaa-bhanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.