फटाके विक्रीसाठी खैरात, भार्इंदर पालिकेकडून नियमांचे उल्लंघन, प्रशासनावर दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 03:30 AM2018-11-07T03:30:28+5:302018-11-07T03:30:44+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये वाढते ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर आणलेले बंधन, मुख्यमंत्री यांनी फटाके फोडू नका सांगत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प केला असताना दुसरीकडे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासनाने मात्र...
मीरा रोड - सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये वाढते ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर आणलेले बंधन, मुख्यमंत्री यांनी फटाके फोडू नका सांगत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प केला असताना दुसरीकडे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासनाने मात्र राजकीय दबाव व आर्थिक फायदा करून देण्यासाठी फटाके विक्र ीच्या परवानगीची खैरात वाटल्याचे समोर आले आहे. पालिकेचे उद्यान, मैदान, आरजी जागा तसेच रस्त्याच्याकडेला निवासी क्षेत्रातही सर्रास परवानगी दिल्या आहेत.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणाने बहुसंख्य नागरिक त्रासले आहेत . त्यातच यंदा सर्वोच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यावर निर्बंध लादले आहेत. फटाके फोडणे हे धर्म शास्त्रात नसताना त्याचा उत्सवाच्या नावाने अवडंबर माजवून प्रदूषण वाढवले जात असल्याने फटाके फोडणे कमी व्हावे तसेच त्याला प्रोत्साहन मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सामान्य नागरिकांचे व्यापक हित पाहून आदेश दिला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम आदींनी प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प सोडत फटाके फोडू नका असे आवाहन सरकारने केले आहे.
सर्वोच्च न्यायालय, राज्य सरकार एकीकडे फटाके फोडणे व प्रदूषण विरोधात भूमिका घेत असताना मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासन व आयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र काहींचे राजकीय व आर्थिक हित जपण्यासाठी शहरभर सर्रास ९२ जणांना फटाके विक्रीसाठी परवानगी दिली आहे.
भार्इंदर पूर्वेच्या राहुल पार्कयेथील प्रमोद महाजन उद्यान व परिसर, नवघर पालिका शाळा मैदान, बाळासाहेब ठाकरे मैदान, शीतलनगर व शांतीनगरमधील आरजी जागा, मीरा रोड मच्छी मार्केटजवळ, पालिकेचे भीमसेन जोशी रूग्णालयाजवळ, महेशनगर आदी ठिकाणी तसेच रस्त्या जवळ व नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी सर्रास फटाके विक्र ीची दुकाने थाटण्यास मंजुरी दिल्याने तेथे फटाक्यांची दुकाने थाटली आहेत.
प्रमोद महाजन उद्यान व परिसरात तर पालिकेने अरूंद रस्ता, नागरिकांची वर्दळ व नागरीवस्तीचा सुद्धा विचार न करता परवानगी दिल्याबद्दल येथील रहिवाशांनी तक्र ारीचा सूर आळवला आहे. येथे राजकीय दबावाखाली आयुक्तांनीच परवानगी द्यायला लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान अग्निशमन दलाने शहरात बेकायदा फटाके विकणाºया १५ स्टॉलवर कारवाई केल्याची माहिती दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी दिली. पोलिसांना अहवाल दिल्याचे ते म्हणाले.
नागरिकांच्या सोयीसाठी व फटाके व्यवसायावर नियंत्रण राखता यावे म्हणून महापालिका मैदान, उद्यान तसेच रस्त्याजवळ फटाके विक्र ीसाठी काही व्यक्तींना परवानगी दिली आहे. प्रमोद महाजन उद्यान येथील तक्र ारी असतील तर कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना सांगतो.
- बालाजी खतगावकर, आयुक्त.
आरजीची जागा व पालिकेचे प्रमोद महाजन उद्यानात नागरिकांची वर्दळ असतानाही भाजपाच्या पदाधिकाºयांना आयुक्तांनीच फटाक्यांची परवानगी दिली आहे. तक्रार करून्ही आयुक्त पाठीशी घालत आहेत.
- अनिल भगत, अध्यक्ष, ओस्तवाल पार्कइमारत
क्र . ३
आयुक्त हे संविधान, कायदे व न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याऐवजी येथील सत्ताधारी व व्यावसायिकांचे एजंट म्हणून काम करत आहेत. सामान्यांना फटाक्यांचा आवाज व धूर प्रदूषणाचा होणारा त्रास आणि सर्वोच्च न्यायालयाने बंधन घातले असताना उलट पालिकेनेच मैदाने, उद्याने, आरजी जागा व रस्त्यालगत परवानगी देऊन फटाक्यांना प्रोत्साहन दिले आहे.
- प्रदीप जंगम,
अध्यक्ष, जिद्दी मराठा प्रतिष्ठान