खांडपे पाणीपुरवठा योजना ठप्प

By admin | Published: January 14, 2017 06:05 AM2017-01-14T06:05:22+5:302017-01-14T06:07:12+5:30

नळाद्वारे घरपोच पाणीपुरवठा करणारी तालुक्यातील चांगली योजना खांडपे ग्रामपंचायतीच्या ढिसाळपणामुळे तब्बल ९ वर्षे बंद

Khandapi water supply scheme jam | खांडपे पाणीपुरवठा योजना ठप्प

खांडपे पाणीपुरवठा योजना ठप्प

Next

मुरबाड : नळाद्वारे घरपोच पाणीपुरवठा करणारी तालुक्यातील चांगली योजना खांडपे ग्रामपंचायतीच्या ढिसाळपणामुळे तब्बल ९ वर्षे बंद पडली आहे.
लघुपाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील खांडपे या धरणातून परिसरातील शिवळे, माल्हेड, आंबेळे तसेच सरळगाव या गावांना २४ तास पाणीपुरवठा होतो.
खांडपे गावातही २००९ मध्ये ग्रामपंचायतीने पाइपलाइन टाकून नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी महावितरणने वीजमीटर बसवले होते. मात्र, याचे महावितरणने बजावलेले बिल ग्रा.पं.ने थकवले आहे. या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना धरणाशेजारील डबक्याचे पाणी प्यावे लागते. यामुळे संतापाचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Khandapi water supply scheme jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.