भिवंडीतील खारबाव रेल्वे स्टेशनची वाट बिकट; चिखलातूनच करावा लागतो प्रवास
By नितीन पंडित | Published: June 27, 2024 04:44 PM2024-06-27T16:44:56+5:302024-06-27T16:46:37+5:30
या ठिकाणी रेल्वे स्टेशन दुरुस्तीचे व नव्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे रेल्वे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
भिवंडी: तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या व दिवा वसई रेल्वे मार्गावर असलेल्या खारबाव रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रेल्वे स्टेशन दुरुस्तीचे व नव्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे रेल्वे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून पावसाळ्यात रस्त्यावरील चिखल तुडवत प्रवाशांना रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे.
भिवंडीतील प्रवाशांना ठाणे मुंबई व वसई असा प्रवास करण्यासाठी दिवा वसई रेल्वे मार्गाचा वापर करावा लागतो, त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी तालुक्यातील नागरिक भिवंडी रोड रेल्वे स्थानक अथवा खारबाव रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात. मात्र खारबाव रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल असल्याने संपूर्ण प्रवासी भिवंडी रोड रेल्वे स्थानकातूनच प्रवास करत आहेत. त्यामुळे खारबाव रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या या गैरसोईकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवासी करत आहेत.