जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:42 AM2019-04-23T02:42:57+5:302019-04-23T02:43:04+5:30

आचारसंहितेचा फटका; पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Kharif crops will be cultivated on 66 thousand hectares in the district | जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांची लागवड

जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांची लागवड

Next

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या कामकाजाचा आढावा सोमवारी घेऊन ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पिकासह अन्य खरीप पीक लागवडीचे नियोजन केले.

खरीप लागवडीच्या नियोजनासाठी दरवर्षी नियोजनभवनमध्ये खरीप लागवडीचे थाटात नियोजन केले जाते. मात्र, यंदा आचारसंहितेचा फटका त्यासही बसला आहे. पालकमंत्र्यांऐवजी येथील समिती सभागृहात कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

त्यावेळी आगामी खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. या हंगामात हेक्टरी एक लाख ५७ हजार ९४९ मेट्रिक टन पीक उत्पादनाचा लक्ष्यांक ठरवण्यात आला आहे. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक जे.एन. भारती, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, कल्याणचे उपविभागीय कृषी अधिकारी जे.एस. बोडके, महाबीजचे पुणे विभागीय व्यवस्थापक अरविंद सोनोने, उपविभागीय व्यवस्थापक एस.एम. तेलंगेपाटील आदी कृषीचा अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्ष्यांक निश्चित
यावेळी माने यांनी २०१८ या मागील वर्षाच्या खरीप हंगामाचा आढावा व २०१९ या वर्षाच्या नियोजनाचे सादरीकरण या बैठकीत स्पष्ट केले. गेल्या वर्षी ५८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली असता त्याद्वारे एक लाख ४४ हजार २२९ मेट्रिक टन उत्पादन घेता आले आहे. यात भातपिकाची उत्पादकता दोन हजार ५५३ किलो प्रति हेक्टर इतकी होती. याशिवाय, नागलीचे पीक हे ८०५ किलो प्रति हेक्टर इतके झाले आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. यापैकी भातपिकासाठी ५९ हजार २७९ हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर, दोन हजार ५७८ किलो प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्ष्यांक निश्चित केला आहे.

Web Title: Kharif crops will be cultivated on 66 thousand hectares in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी