रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच खत्रीची दुर्घटना: पालिकेने इमारत केली सील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:52 AM2021-09-13T00:52:05+5:302021-09-13T00:56:18+5:30

राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवाने रविवारची दुर्घटना घडल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला आहे.

Khatri's accident due to negligence of residents: BMC seals the building | रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच खत्रीची दुर्घटना: पालिकेने इमारत केली सील

इमारत झाली होती अतिधोकदायक

Next
ठळक मुद्देइमारत झाली होती अतिधोकदायक तरीही स्ट्रक्चरल आॅडीटच्या अहवालानुसार दुरुस्तीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवाने रविवारची दुर्घटना घडल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला आहे. विशेष म्हणजे स्ट्रक्चरल आॅडीटमध्येही दर्शविल्याप्रमाणे सी विंगने दुरुस्ती न केल्यामुळे रहिवाशांना या दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे.
खत्री इमारत धोकादायक म्हणून २०१८ मध्येच ठाणे महापालिकेने घोषित केली होती. त्यामुळेच या इमारतीमधील रहिवाशांना स्ट्रक्चरल आॅडीट करण्याच्या तसेच त्यानुसार इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याच्याही सूचना वारंवार नोटीसा बजावून दिल्या गेल्या होत्या. या इमारतीच्या ए आणि बी विंगमधील रहिवाशांनी स्ट्रक्चरल आॅडीटनुसार इमारतीमध्ये दुरुस्तीही केली होती. सी विंगच्या रहिवाशांनी मात्र स्ट्रक्रचरल आॅडीटकडे आणि महापालिकेने इमारत रिक्त करण्याच्या नोटीसीकडेही दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे इमारत
दुरु स्तीची नोटीस बजावून त्याचे स्मरणपत्रही वारंवार देण्यात आले. तरीही रहिवाशांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानेच दुर्दैवाने ही घटना घडल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
घटनेनंतर तात्काळ ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार, उप आयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पथकाच्या माध्यमातून याठिकाणी कायदेशीर कारवाई करीत इमारत पूर्णपणे रिक्त करुन सील केली.
* या इमारतीची २०१३ मध्ये पाहणी करून ती महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २६४ (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावली होती. या नोटीसीमधील मुदतीनंतरही रहिवाशांनी ती रिक्त न केल्याने कलम २६८ (सी-१) अन्वये संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती रिक्त न केल्याने २६८ (५) अन्वये राबोडी पोलिसांकडेही ती इमारत रिक्त करुन देण्याबाबत पालिकेने पत्र दिले होते.
* या इमारतीस ठाणे महापालिकेने पुरविलेल्या सर्व पाणी, विद्युत आणि ड्रेनेज सारख्या सेवा खंडित करण्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनाही पत्र दिले होते. तसेच ही इमारत सी 2- बी अर्थात अतिधोकादायक या वर्गवारीत असल्याचा अहवाल महापालिकेच्या तालिकेवरील स्ट्रक्चरल आॅडिटर मे.सेंटरटेक यांनी दिलेला असून, त्यामध्ये ही इमारतीची तातडीने दुरु स्ती करण्याचे सूचविण्यात आले होते. इमारत तातडीने रिक्त करून दुरु स्त करावी. तसे न केल्यास दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही,अशीही नोटीस बजावली होती. इमारत पूर्ण रिकामी करु न काम न केल्यामुळेच या दुर्घटनेला रहिवाशांना सामोरे जावे लागले. या घटनेनंतर उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पथकामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने ही इमारत तात्काळ खाली करून सील केल्याचे पालिकेने म्हटले आहे.

Web Title: Khatri's accident due to negligence of residents: BMC seals the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.