खेलो इंडिया स्पर्धा : कल्याणच्या सौम्याला सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:36 AM2020-01-21T01:36:42+5:302020-01-21T01:37:14+5:30
गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली.
ठाणे : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात कल्याणच्या सौम्या दळवी हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय विक्र मासह सुवर्णपदक मिळवत ठाणे जिल्ह्याचे नाव उंचावले. या स्पर्धेत तिने आपलाच गतवर्षाचा विक्रम मोडीत काढला.
गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली. तिने गतवर्षी नोंदवलेला एकूण ११२ किलो हा राष्ट्रीय विक्र म मोडताना ११३ किलो वजन उचलून नवा विक्रम केला. हा विक्रम क्षणभंगूर ठरवताना तिची सहकारी आरती तातगुंटी हिने ११५ किलो वजन उचलून विक्रमाला गवसणी घातली. मात्र, शेवटच्या प्रयत्नात सौम्याने ११६ किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्र माला गवसणी घातली आहे. तिने गतवेळी खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. तसेच तिने राष्ट्रकुल युवा स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. सौम्याचे वडील सुनील हे शिवछत्रपती पुरस्कारविजेते वेटलिफ्टर असून त्यांच्या तसेच अनिल माहुली, मधुसूदन देशपांडे आणि रिक्र ीएशन व्यायामशाळा, कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे. ती कल्याण येथील होली क्रॉसमध्ये शिकत असून तिची आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.