खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे वाघबीळमधून अपहरण; कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा
By अजित मांडके | Updated: May 31, 2024 19:33 IST2024-05-31T19:32:32+5:302024-05-31T19:33:20+5:30
दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे.

खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे वाघबीळमधून अपहरण; कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे: दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून या मुलीचा शोध घेण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. ठाण्यातील घोडबंदर रोड, वाघबीळ भागात राहणारी ही मुलगी २८ मे २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुकानावर जाते, असे सांगून घराबाहेर पडली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही.
तिचा परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणींकडेही ती आढळली नाही. अखेर, तिच्या अपहरणाची शक्यता व्यक्त करुन तिच्या आईने या प्रकरणी २९ मे २०२४ रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या शोधासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली असून तिचा परिसरात शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.