कोयत्याने वार करुन खूनी हल्ला करणाऱ्यास दिड वर्षांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:14 AM2020-10-08T01:14:24+5:302020-10-08T01:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : टोळी युद्धातून सुमित सकपाळ (२४, रा. घोडबंदर रोड, ठाणे ) या तरुणांवर आपल्या चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: टोळी युद्धातून सुमित सकपाळ (२४, रा. घोडबंदर रोड, ठाणे) या तरुणांवर आपल्या चार साथीदारांच्या मदतीने कोयत्याने खूनी हल्ला करुन गेल्या दिड वर्षांपासून पसार झालेल्या अरबाज उर्फ बाबू खवºया मकबूल खान याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला आता कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घोडबंदर रोड येथे राहणारा सुमित हा आपल्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करुन ६ एप्रिल २०१९ रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास घराकडे येत होता. त्यावेळी तो हिरानंदानी इस्टेट येथील ‘द वॉक’ या इमारतीच्या शेजारी उभा असताना मोटारसायकलवरु न आलेल्या एका टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर पाच जणांच्या टोळक्यापैकी तिघांनी सकपाळ यांना पकडले. तर चौथ्याने त्याच्या डाव्या पायाजवळ कोयत्याने हल्ला केला होता. यात सकपाळ याच्या उजव्या कानाजवळ, डाव्या डोळयाच्या वर आणि कपाळावरही गंभीर जखमी केले. या झटापटीत त्याची सोनसाखळीही गहाळ झाली होती. हल्ल्यानंतर हे टोळके तिथून पसार झाले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यात चौघांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा पाचवा साथीदार अरबाज हा पसार झाला होता. कासारवडवली पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे पथक गेल्या दिड वर्षांपासून त्याच्या मागावर होते. दरम्यान, अरबाज ठाण्यातील धर्मवीर नगर येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ६ आॅक्टोबर रोजी अरबाजला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले.