भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:11+5:302021-09-15T04:46:11+5:30

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ साली उभारण्यात आला. हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच ...

Kingdom of pits on the flyover at Bhiwandi | भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

Next

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ साली उभारण्यात आला. हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. पाच महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवर सात कोटी रुपये खर्च केले असून अजूनही दिखाव्यासाठी दुरुस्ती काम सुरूच आहे. मात्र अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसून, या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

शासनाकडून सुमारे सात कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. परंतु केवळ कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून आता या उड्डाणपुलावर मोठमोठे खोल खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. खड्ड्यांमुळे लहानमोठे अपघात होत असून, वाहने नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. याकडे भिवंडी महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kingdom of pits on the flyover at Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.