किरतकर लोकसभा निवडणुकीत भूमिका पार पाडणार - सुरेश साखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:19 AM2018-08-30T03:19:15+5:302018-08-30T03:19:35+5:30
बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांची समाजात चांगली प्रतिमा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे.
डोंबिवली : बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांची समाजात चांगली प्रतिमा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. असा नेता बहुजन समाजाला मोठे केल्याशिवाय राहणार नाही. किरतकर आगामी लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी व्यक्त केला.
डोंबिवली येथे बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी साखरे बोलत होते. त्यावेळी आमदार सुभाष भोईर, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, जी.टी. शिंदे, के.एल. जाधव, बसपाचे महासचिव प्रशांत इंगळे, रामसुमेर जैसवार, राजेश कांबळे, माजी नगरसेवक रवी पाटील आणि युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर, युगंधर किरतकर, मनोज किरतकर, पराग वाघमारे, तृष्णा वाघमारे. डॉ. रश्मी दाहिंजो आदींनी शुभेच्छा दिल्या. कलावंत किरण भालेराव म्हणाले की, सामाजिक, राजकीय कार्य व आपला व्यवसाय ही तिन्ही क्षेत्रे किरतकर समर्थपणे हाताळत आहेत. यावेळी अनिल खंडागळे यांच्या वाद्यवृंदाने उपस्थितांचे मनोरंजन केले.