किसान ॲप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:40 AM2021-05-26T04:40:03+5:302021-05-26T04:40:03+5:30

१) भातावरील रोग दूर करण्यासाठी मार्गदर्शन २) पावसाची जाणीव ३) आपत्तीची पूर्वसूचना ४) योजनांची माहिती ५) रोगांचा प्रादुर्भाव संपवण्याची ...

Kisan App | किसान ॲप

किसान ॲप

googlenewsNext

१) भातावरील रोग दूर करण्यासाठी मार्गदर्शन

२) पावसाची जाणीव

३) आपत्तीची पूर्वसूचना

४) योजनांची माहिती

५) रोगांचा प्रादुर्भाव संपवण्याची माहिती

...........

* प्रतिक्रिया -

या तौक्ते चक्रीवादळासह आधीही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची जाणीव कृषी विभागाने आधीच करून दिली आहे. या वादळाच्या आधी सतत मेसेज देऊन शेतकऱ्यांना या अपत्तीस तोंड देण्यासाठी सज्ज ठेवले. त्यामुळे वादळवारे येऊन गेल्यावर अलर्ट असे म्हणणे चुकीचे आहे. वर्षभरात पाऊस, आपत्ती, पीकसंरक्षण, शेतकऱ्यांच्या योजना आदींचे दीड लाख मेसेज शेतकऱ्यांना देऊन सतर्क ठेवण्यात येत आहे.

- अंकुश माने

जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे

.....

शेतकरी प्रतिक्रिया -

१) या चक्रीवादळाची माहिती आधी मिळाली. पण जे लोक केंद्र शासनाच्या किसान ॲपवर आहेत, त्यांनाच ती मिळाली. याआधी शासनाचे बीएसएनएल असताना त्यांचे फ्री मेसेज व शेतकऱ्यांना बोलण्यासाठी पैसे खर्च होत नसत. पण आता ही कंपनी नसल्यामुळे कधी कधी मेसेज मिळतो.

- प्रकाश भागरथ

वेहळोली, शहापूर

.......

२) या चक्रीवादळाच्या पूर्वकल्पनेचा मेसेज आलेला नाही. हे वास्तव आहे; पण कधी कधी मेसेज येतो. आंबा मोहरच्या काळासह फवारणीची माहिती देणारा, खोड कीडा फवारणी, पाने गुंढळणारी, खाणारी आळी आदींच्या मार्गदर्शनाचा मेसेज येतो.

- भगवान दवणे

ठुणे, मुरबाड

......

किसान ॲपचा मेसेज आलेला नाही. मात्र, हवामान खात्याने काही दिवस आधीच सतर्क करणारे मेसेज देऊन जनजागृती केली होती. त्यांच्या सूचनेस अनुसरून समुद्रातील बोटी किनाऱ्यास लावण्यात आल्या होत्या. किनाऱ्यालगतच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले होते.

- ॲड. राजकुमार पाटील, मुरबाड

--

Web Title: Kisan App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.