९ वीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार, भाईंदरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 09:17 PM2018-01-04T21:17:01+5:302018-01-04T21:17:33+5:30
९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे.
मीरारोड - ९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ठाणे न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मुलीचा सतत पाठलाग करत असे. एकतर्फी प्रेमातुन हा प्रकार घडल्याचे सांगीतले जाते.
भार्इंदर पश्चिमेस राहणारी सदर पिडीत मुलगी ही भाईंदर पुर्वेच्या शाळेत शिकते. बुधवारी सकाळी तीची आई तीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. पावणे सात च्या सुमारास भार्इंदर सबवे मध्ये दोघी जात असताना अचानक विनोदकुमार कश्यप (२५ ) रा. जय अंबेनगर
याने मागुन जाऊन दोघींना गाठले. आईला धक्का देत त्याने चाकूने मुलीवर वार करत पळ काढळा. या घटनेने मुलीच्या आईला देखील धक्का बसला. त्याच वेळी तेथुन जाणारया उमाशंकर यादव या रिक्षा चालकाने दोघींना पाहिले व त्वरीत नजिकच्या खाजगी रुग्णालयात नेले. पण तेथे उपचार न मिळाल्याने मुलीला कांदिवलीच्या शताव्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलीवर चाकूने ५ ते ६ वार झाले आहेत. गाल, छाती, हात व पायावर वा झाले असुन तीची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांनी सांगीतले.
आरोपी विनोदकुमार हा मुळचा उत्तरप्रदेशचा असुन तो भार्इंदर पुर्वेच्या एका स्टील कारखान्यात नोकरीला आहे. जयअंबे नगर मध्ये तो आपल्या नातलगा कडे राहतो. गेल्या दिड - दोन वर्षां पासुन तो पिडीत मुलीचा पाठलाग करायचा, तीची छेड काढायचा. नेहमीच्या जाचाला कंटाळलेल्या त्या मुलीने अखेर घडत असलेला सर्व प्रकार पंधरा दिवसां पुर्वी आपल्या घरी सांगीतला. त्यानंतर तीच्या पालकांनी विनोदला समज दिली होती.
पण याच गोष्टीचा राग येऊन विनोदने बुधवारी सकाळी भार्इंदर येथील मासळी बाजारातुन चाकू खरेदी केला. व सबवे मध्ये आई व मुलीला एकटे गाठुन चाकूने वार करत पलायन केले.
आरोपी विनोद कुमार हा पळुन गेला होता. घटना समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाजुका पाटील सह कदम, भोई आदिंनी त्याचा शोध सुरु केला.
पळालेल्या आरोपीस तो काम करत असलेल्या स्टील कारखाना मालकाने बोरीवली पोलीस ठाण्यात हजर केले. तेथुन पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असे सुत्रांनी सांगीतले.
तर या घटनेने खळबळ उडाली असुन पालिकेच्या सबवे मधील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय.