‘कलेक्टर अ‍ॅडमिन’द्वारे अर्जदारांना आता मिळणार आॅनलाइन माहिती !

By admin | Published: August 5, 2015 12:14 AM2015-08-05T00:14:13+5:302015-08-05T00:14:13+5:30

विविध कामांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अर्जावर झालेल्या कारवाईची माहिती त्यांना तत्काळ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांसह

'Knowledge Commissioner' will get online information from Collector Edin! | ‘कलेक्टर अ‍ॅडमिन’द्वारे अर्जदारांना आता मिळणार आॅनलाइन माहिती !

‘कलेक्टर अ‍ॅडमिन’द्वारे अर्जदारांना आता मिळणार आॅनलाइन माहिती !

Next

ठाणे : विविध कामांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अर्जावर झालेल्या कारवाईची माहिती त्यांना तत्काळ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांसह जिल्हाधिकारी कार्यालयातही ‘कलेक्टर अ‍ॅडमिन’ या पदाची निर्मिती करून एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याची जबाबदारी दिली जाणार आहे. यासह जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या कार्यालयांमध्येही अ‍ॅडमिन सेवा १५ आॅगस्टपासून ठाण्यासह राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा जिल्ह्यांत एकाच दिवशी सुरू केली जाणार आहे.
व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, मेसेज आदी स्वरूपाच्या आॅनलाइनच्या जगात मागे न राहता राज्य शासनाने ‘आपले सरकार’ हा प्रकल्प राज्यभर लागू केला आहे. तत्पूर्वी राज्यातील सहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या कार्यालयांत आॅनलाइन सेवा देण्यासाठी ‘अ‍ॅडमिन’ या पदाची निर्मिती करून त्याद्वारे नागरिकांस त्यांच्या अर्जाची माहिती ‘आॅनलाइन’ घरी बसून घेता येणार आहे. यासाठी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ‘कलेक्टर अ‍ॅडमिन’पद तयार करून एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी दिली जाणार आहे.
जि.प.साठी झेडपी अ‍ॅडमिन, ग्रामीण भागासाठी तैनात असलेल्या ‘पोलीस अधीक्षक’ कार्यालयासाठी एसपी अ‍ॅडमिन, ठाणे पोलीस आयुक्त व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ‘सीपी अ‍ॅडमिन’ आॅनलाइन सेवा देणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या महानगरपालिकांसाठी कार्यालयांमध्ये ‘म्युनिसिपल अ‍ॅडमिन’ कार्यरत होऊन मोबाइल मेसेज, ई-मेल आदींवर १५ आॅगस्टपासून माहिती मिळेल.

Web Title: 'Knowledge Commissioner' will get online information from Collector Edin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.