मौत का कुआं : विहीरीच्या पाण्यात ई कोलाय आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 09:29 PM2018-11-14T21:29:34+5:302018-11-14T21:30:35+5:30
सार्वजनिक आरोग्य खात्याचा अहवालात स्पष्ट
कल्याण - शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिराजवळील विहीरीत पाच जणांच्या मृत्यूची घटना घडली होती. या विहीरीतील पाण्याचे नमुने कल्याण डोंबिवली महापालिकेने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोकण भवन येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. या प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाला असून विहीरीच्या पाण्यात इ कोलाय आढळून आला आहे. सांडपाण्यात हा इ कोलाय मिळून येतो. विहीरीचे पाणी पिण्या योग्य नाही. तसेच पाणी जड आहे असा निष्कर्ष प्रयोगशाळेने नोंदविला आहे.
महापालिकेने घटनेच्या दिवशी सायंकाळी अपघातग्रस्त विहीरीतील पाण्याचे नमुने गोळा करुन ते कोकण भवन येथील प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले होते. 1क्क् मिली लिटर पाण्याच्या नमुन्यात कोलीफॉर्म्सची मात्र 16 इतकी आढळून आली आहे. थरमोटॉलरंट कोलीफॉर्म्सचीही 16 इतकी मात्र आहे. तर इ कोलायची मात्रपण 16 मिळून आली आहे. हे तीन प्रकार सूक्ष्मजंतूचे आहेत. सांडपाण्यात हे आढळून येतात. महापालिकेच्या गटातून वाहणारे सांडपाणी विहीरीच्या पाण्यात ङिारपत असावे हाच निष्कर्ष प्रयोग शाळेच्या अहवालातून पुढे आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालाने सांडपाण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहीरीत सांडपाणी मिसळत होते. आसपासच्या रासायनिक कारखान्यातून कोणत्याही प्रकारचे रासायनिक सांडपाणी सोडले जात नसल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या कारवाई पथकाने कारखान्यातून गटारी वाटे विहीरीच्या दिशेने रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याचा दावा केला होता. प्रयोग शाळेच्या अहवालापश्चात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रथमदर्शनाची दावा खरा ठरला आहे. मात्र दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांनी मुंबई येथील पर्यावरण प्रयोग शाळेस पाठविले होते. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच निरी सारख्या संस्थेने विहीरीच्या ठिकाणी सयंत्र लावून त्याठिकाणीचे मोजमाप केले होते. मोजमाप करते वेळी मिथेन वायू विहीरीत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला होता. निरीचा अहवाल अद्याप आलेला नाही. या दोन्ही अहवालापश्चात विहीर प्रदूषित होती की नाही ही बाब समोर येणार आहे. अपघात ग्रस्त विहीरीची पाहणी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी केली होती. त्यावेळी ही विहीर बुजविण्यात येईल. त्यासाठी कायदेशीर बाबी तपासून हे काम केले जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानंतर विहीरीवर लोखंडी जाळी टाकण्यात आली आहे. विहीर अद्याप बुजविण्यात आलेली नाही.