कोणार्क बँकच्या डबघाईने, खातेदारात भीती; पैशाचे व्यवहार ठप्प, रिझर्व बँकेचे निर्बंध
By सदानंद नाईक | Published: April 24, 2024 09:58 PM2024-04-24T21:58:06+5:302024-04-24T21:58:27+5:30
भारतीय रिझर्व बँकेने कोणार्क बँकेवर निर्बंध लादल्याचे बोलले जात असून याबाबत बँक प्रशासनासोबत संपर्क झाला नाही.
उल्हासनगर : शहरातील कोणार्क बँकेच्या शाखेतून पैसे काढण्याचे व्यवहार ठप्प पडल्याने, खातेदारात भीतीचे वातावरण आहे. भारतीय रिझर्व बँकेने कोणार्क बँकवर निर्बंध लादल्याचे बोलले जात असून याबाबत बँक प्रशासनासोबत संपर्क झाला नाही.
उल्हासनगरात कोणार्क बँकेच्या एकून ३ शाखा असून मुख्य कार्यलय लिंक रोडवर आहे. बँकेचे दहा हजार खातेदार आणि ठेवीदार आहेत. बॅंक अनेक वर्षा पासून तोट्यात जात असल्याची चर्चा होती. परंतु अधिकृतपणे याबाबत बँकेच्या वतीने कोणती ही माहिती देण्यात आलेली नोव्हती. बॅंक आर्थिकरित्या ढासळत असल्याने कोणार्क बँकेच्या संचालक मंडळानी मागच्या काही वर्षा पासून शेयर धारकांना डीव्हडंड देणे बंद केले. असे बोलले जात आहे. रिझर्व बँकेने कोणार्क बँकेच्या अंतर्गत तपासणीला सुरुवात करताना, बँकेवर अनेक निर्बंध घातले आहे. महत्वाचे म्हणजे पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची पाच लाखा पर्यंतची ठेव, विमा दाव्याची रक्कम फक्त ठेव विमा आणि क्रेडिट गँरंटी कॉरपोरेशन (डीआईसीजीसी)कडून मिळण्याचा अधिकार असेल, तसेच कोणार्क बॅंकवर बँकिंग रेगुलेशन ऍक्ट १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत निर्देशांच्या स्वरूपात निर्बंध २३ एप्रिल २०२४ रोजी व्यवसाय बंद झाल्या पासून कोणार्क बॅंक कोणत्या ही कर्जाची नूतणीकरण किंवा कोणती ही गुंतवणूक रिझर्व बँके च्या मंजुरी शिवाय करू शकत नाही.
बॅंक निधी उधार देणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे. यासह कोणते ही दायित्व स्वीकार करणार नाही, तसेच कोणतीही मालमत्ता विकणे, खरेदी करणे, हस्तातंरण करणे, किंव्हा विल्हेवाट लावणे. अश्या अनेक व्यवहारावर रिझर्व बँकेने कोणार्क बँकेवर निर्बंध लादल्याने बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. रिझर्व बँकेच्या या कारवाईने चिंताग्रस्त झालेल्या खातेदारांनी रिझर्व बँकेकडे मागणी केल्याचे समजते. आमच्या ठेवी आणि खात्यात असलेली रकम तातडीने देण्यात यावी, अशी खातेदारांची मागणी आहे.