ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी
By सुरेश लोखंडे | Published: November 17, 2022 07:41 PM2022-11-17T19:41:31+5:302022-11-17T19:42:13+5:30
ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी केली.
ठाणे : केंद्र शासनाच्या जल शक्ती मंत्रालय, पेयजल व व स्वच्छता विभागाच्या पथकांने कल्याण तालुक्यातील कोंढेरी व आदिवली गावांना भेट देऊन योजनांच्या पाहणीसह गांवकरी व महिलांशी त्यांनी मनसोक्त संवाद सांधला.
केंद्र सरकारच्या या पाहणी दौऱ्यात जलशक्तीच्या सचिव वीणा महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजिव जयस्वाल, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलमिशनचे ॠषिकेश यशोद, प्रकल्प संचालक रणधीरजी सुर्यवंशी, मुख्य अभियंता राजेश निघोट, ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळ, कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत दळवी, गटविकास अधिकारी अशोक भवारी आदी उपस्थित होते.
या दौऱ्यात प्रथम कोंढेरी गावातील स्वच्छता, शोषखडडे, नॅडॅप खडडे, पाझर खडडे, शालेय शौचालये, पाणी पुरवठा योजना, वैयक्तीक नळ कनेक्शन, पाणी गुणवत्ता आदींची पाहणी केली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्याचे लेझिम व पारंपारीक वेशभूषेत औक्षण केले. आदिवली गावातही सरपंच, ग्रामस्थ, आदिवासी महिलांनी पारंपारंक आदिवासी संस्कृतीनूरुप केंद्रीय पथकाचे स्वागत केले. त्यानंतर गावात फेरफटका करुन गावातील योजनांमधून घेतलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.