सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ७ ऑक्टोबर रोजी कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 1, 2022 04:03 PM2022-10-01T16:03:46+5:302022-10-01T16:04:36+5:30
Thane News: सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘कै.ग.का.फणसे व कै.इंदिराबाई फणसे स्मृती चषक’ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘कै.ग.का.फणसे व कै.इंदिराबाई फणसे स्मृती चषक’ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी ‘कै.इंदिराबाई फणसे या मथळ्यांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत यंदाही चुरस आहे.
तरूणांमधून देशहितास आवश्यक विचारसंपन्न वक्ते घडवावेत या उदात्त हेतूने सदर वक्तृत्व स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली, यंदाचे या स्पर्धेचे १८ वे वर्षे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात येणार आहे. तर, विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व फिरता चषक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. प्रत्येक सहभागी महाविद्यालयांतील कमाल दोन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी यंदा ‘मला राजकारणात जायचंय…!’,’अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा, मागोवा देशस्थितीचा, ‘साहित्यिकांची जन्मशताब्दी म्हणजे वाचन महोत्सव’, ‘आभासी शिक्षणव्यवस्था -सकारात्मक की नकारात्मक’,’कृत्रिम जगाची वाढती मागणी : प्रगतीची खूण की धोक्याची नांदी’ अशा विविध विषयांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक महाविद्यालयांनी https://bit.ly/3RxsS0w या लिंकवर क्लिक करून ५ ऑक्टोबरपूर्वी स्पर्धकांची नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन, स्पर्धा प्रमुख प्रा.मनिषा राजपूत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.हरेश्वर भोये- ९७६७६४५७७० व प्रा.महेश कुलसंगे-९०११२७८४८८ यांच्याशी संपर्क साधावा असेही या आवाहनात म्हटले आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी डॉ.वंदना शिंदे, प्रा.दिलीप वसावे, प्रा.कांतीलाल चव्हाण मोलाची भूमिका निभावत आहेत. संस्थेचे सचिव कमलेश प्रधान व प्राचार्य डॉ.गणेश भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.