कोकणातील उद्योजक आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:54 AM2018-05-01T01:54:27+5:302018-05-01T01:54:27+5:30

मोठा व्यवसाय किंवा एखादा छोटा उद्योग सुरु करायचा तर, त्यासाठी नोंदणी किंवा परवाना घेणे हे बंधनकारकच आहे. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागात कोकणातून सुमारे दोन

Konkan Enterprises Online | कोकणातील उद्योजक आॅनलाइन

कोकणातील उद्योजक आॅनलाइन

Next

पंकज रोडेकर 
ठाणे : मोठा व्यवसाय किंवा एखादा छोटा उद्योग सुरु करायचा तर, त्यासाठी नोंदणी किंवा परवाना घेणे हे बंधनकारकच आहे. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागात कोकणातून सुमारे दोन लाख छोट्या-मोठ्या उद्योजकांनी अन्नासंदर्भातील आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे कोकणातील चारही जिल्ह्यात रस्त्यावरील उद्योग-धंदेवाल्यापासून ते मोठ्या उद्योजकाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे वेळेचा आणि मनुष्यबळाचा अपव्यय टळला आहे. तर, नोंद करताना जमा होणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीतून आणि पैसे भरताना जमा होणाºया बनावट नोटांचाही प्रश्न सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिवसेंदिवस छोट्या-मोठ्या उद्योग-धंद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांची माहिती सुरक्षितरित्या संकलित करून ठेवण्यासाठी २०१४ पासून एफडीएमध्ये आॅनलाइन पद्धत सुरु झाली. तसेच दरवर्षी साधारणत: ८ ते १० हजार उद्योजक नोंदणी किंवा परवान्यासाठी अर्ज सादर करतात. त्यानुसार, डिसेंबरपर्यंत कोकणात एक लाख ७७ हजार ३५१ इतक्या उद्योजकांची आॅनलाइन नोंद आहे. तर, आॅनलाइन पद्धत लागू झाल्यानंतर एफडीएमार्फत व्यापारी संघटनांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे.
त्यामुळे सध्या आॅफलाइनने कोणतीच नोंदणी किंवा परवान्याची नोंद केली जात नाही. मात्र, त्या संदर्भातील दिले जाणारे प्रमाणपत्र फक्त आॅफलाइनने दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भ्रष्टाचारालाही लगाम बसल्याचे म्हणणे आहे.

आॅनलाइन नोंद अर्ज करणे सुरु झाल्यापासून त्यासाठी लागणारे कागदपत्रे जमा करून ती जपून ठेवावी लागत. त्यासाठी मोठ्याप्रमाणात जागा व्यापली जात होती. तसेच वर्षांनुवर्ष ठेवलेल्या कागदावर धूळीचे साम्राज्य पसरत असे.त्यामुळे आरोग्याच प्रश्न उपस्थित होत होता. तसेच एखाद्यावेळी जुने कागदपत्रे शोधही घेणे एक कटकटच होऊन बसली होती. त्या सर्व त्रासातून आता सुटका झाली आहे.

मागील वर्षभरात कोकण विभागात आॅनलाइन पद्धतीने उद्योजकांनी ८ कोटी ७३ लाख ४० हजार ८८५ भरले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ५ कोटी ८३ लाख १३ हजार ६६७, रायगड १ कोटी ९५ लाख ५४ हजार ४५६,रत्नागिरी ५९ लाख ७९ हजार ८५० तर सिंधूदुर्ग ५४ लाख ९३ हजार ९०० रुपये उद्योजकांनी नियमाप्रमाणे पैसे भरले आहेत.

Web Title: Konkan Enterprises Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.