कोकण महोत्सवामुळे संस्कृतीला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:04 AM2019-01-30T00:04:54+5:302019-01-30T00:05:12+5:30

विविध लोककला सादर; कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचा पुढाकार

The Konkan festival celebrates culture | कोकण महोत्सवामुळे संस्कृतीला उजाळा

कोकण महोत्सवामुळे संस्कृतीला उजाळा

googlenewsNext

कल्याण : निसर्गसंपन्न कोकणातील माणूस रोजगारासाठी मुंबई-उपनगरांत स्थायिक झाला. पण हा कोकणी माणूस आपल्या लाल मातीचा गंध कधीच विसरला नाही. मुंबईत जन्मलेली पिढीही कोकणातील गावावर तेवढेच प्रेम करते. कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडीतील पोटे मैदानावर झालेल्या कोकण महोत्सवाने लाल मातीतील संस्कृतीला नवे कोंदण मिळाले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे झालेल्या या महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष्यपदी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे होते.

पालखी मिरवणुकीने महोत्सवाला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील जाणनले येथील कलामंच, केळवली-लांजाचे शक्ती-तुरा डबलबारी यांची शाहिरी, शिवचक्र तीर्थ दशावतारी नाटक, ‘बायकोचा बैल’ हे मालवणी नाटक, परळचे डबल बारी भजन, मंगळागौर आदी कार्यक्रम झाले.

प्रजासत्ताक दिनी महोत्सवात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्र म झाला. रविवारी शान कोकणची कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे विशेष आकर्षण होते. कुणकेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती.
बिळवस (ता. मालवण) येथे शाळा सुरू करणारे माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांच्यासह विविध क्षेत्रांतील कोकणातील सुपुत्रांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकणतील मेवा, मसाले, लोणचे, खाद्यपदार्थ यांना खवय्यांची विशेष पसंती मिळाली. त्यातून बचत गटाच्या महिला आणि छोट्या व्यावसायिकांची लाखोंंची उलाढाल झाली.

कोकणच्या कला, कलावंत यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचिवण्याचा महोत्सवातून प्रयत्न केला. माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील सर्व कोकण रिहवासी संघ, संघटना, मंडळे, त्यांचे पदाधिकारी, कोकणातील माणूस महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आला याचा आनंद आहे.
- संजय मोरे,
अध्यक्ष, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान, कल्याण

Web Title: The Konkan festival celebrates culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.