मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 11, 2023 12:41 PM2023-10-11T12:41:05+5:302023-10-11T12:41:51+5:30

२२ व २३ नोव्हेंबर रोजी प्राथमिक तर १६ डिसेंबर रोजी अंतिम फेरी*

Konkan Regional Open Singles Tournament with Mumbai, Konkan Cup - 2023 announced | मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर

मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर

ठाणे : कोकणातील नव्या कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कोकण चषक - २०२३', मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी २२ नोव्हेंबर व गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी शनिवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती कोकण कला अकादमीचे अध्यक्ष, आमदार संजय केळकर व कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. प्रदीप ढवळसर यांनी दिली.

कोकण चषक 2023 ची नियोजन सभा आमदार केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा ढवळ यांच्या उपस्थितीत आनंद विश्व गुरुकुल, रघुनाथ नगर, ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्यांनी ही स्पर्धा जाहीर केली. कोकण चषकाचे हे १६ वे वर्ष आहे. कोकण चषक - २०२३ मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी २२ नोव्हेंबर व गुरुवारी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी, आनंद विश्व गुरुकुल, लाॅ काॅलेज, मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे होईल आणि शनिवारी १६ डिसेंबर - २०२३ रोजी अंतिम फेरी डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे घेण्यात येईल. या स्पर्धेत आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट एकांकिका : प्रथम पारितोषिक रुपये २५, ०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १५, ००० व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये १०, ००० व आकर्षक चषक, उत्तेजनार्थ - (२) रुपये ५, ०००/- व आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष: प्रथम पारितोषिक रुपये २, ०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १, ५०० व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये १, ००० व आकर्षक चषक, उत्तेजनार्थ - रुपये ५००/- व आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनय स्री: प्रथम पारितोषिक रुपये २, ०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १, ५०० व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये १, ००० व आकर्षक चषक, उत्तेजनार्थ रुपये ५००/- व आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक रुपये ३, ०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये २, ०००/-, तृतीय पारितोषिक रुपये १, ०००/, सर्वोत्कृष्ट लेखक (नवीन संहितेसाठी): पारितोषिक रुपये ३, ०००/- व आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य: पारितोषिक रुपये ३, ०००/- व आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: पारितोषिक रुपये ३, ०००/- व आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना: पारितोषिक रुपये ३, ०००/- व आकर्षक चषक आदी पारितोषिके दिली जाणार आहेत, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

Web Title: Konkan Regional Open Singles Tournament with Mumbai, Konkan Cup - 2023 announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.