ऑर्डनन्स फॅक्टरीचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:18+5:302021-05-12T04:41:18+5:30
अंबरनाथ : देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीने आता कोविड रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय सुरू केले आहे. या ...
अंबरनाथ : देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीने आता कोविड रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय सुरू केले आहे. या ठिकाणी अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील कम्युनिटी हॉलमध्ये हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ७० ऑक्सिजन बेडची सुविधा असणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीचे सरव्यवस्थापक यादवेंद्र सोमरा यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी औषधे, जेवण, ऑक्सिजन आणि अन्य सुविधा ऑर्डनन्स फॅक्टरीकडून पुरवल्या जाणार असून डॉक्टर, नर्स आणि अन्य मनुष्यबळ अंबरनाथ पालिकेकडून पुरवले जाणार आहे. या रुग्णालयामुळे ऑर्डनन्स इस्टेट परिसरात राहणाऱ्या रुग्णांनाही जवळच्या जवळ सुविधा मिळणार आहे.