कृष्ण निवास दोन वर्षांनंतरही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:07 AM2017-08-04T02:07:29+5:302017-08-04T02:07:29+5:30

बघताबघता कृष्ण निवास कोसळण्याच्या दुर्घटनेला दोन वर्षे होत आली. तीन ते चार कुटुंबांतील डझनभर जीव घेणाºया या घटनेने संपूर्ण नौपाडा हादरले.

 Krishna residence is waiting for redevelopment even after two years | कृष्ण निवास दोन वर्षांनंतरही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

कृष्ण निवास दोन वर्षांनंतरही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

Next

ठाणे : बघताबघता कृष्ण निवास कोसळण्याच्या दुर्घटनेला दोन वर्षे होत आली. तीन ते चार कुटुंबांतील डझनभर जीव घेणाºया या घटनेने संपूर्ण नौपाडा हादरले. परंतु, पालिका प्रशासन तसूभरसुद्धा हलले नाही. या दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी गठीत केलेल्या समितीस आपला अहवाल देण्यास तब्बल एक वर्ष लागले. आजही निळ्या पत्र्यांच्या मागे कृष्ण निवासाचे अवशेष विखुरलेले असून पुनर्विकास दृष्टिक्षेपातही नाही.
काळ झपाट्याने बदलतोय आणि पालिकेच्या अनास्थेने इमारती पडून जीव जाणे चालूच आहे, अशी व्यथा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही याबाबत मौन बाळगून आहेत.
दोन वर्षांपूर्वी ४ आॅगस्टच्या दिवशी नौपाड्यातील ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून १२ जण दगावले, तर ७ जण जखमी झाले होते. आज या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, आजही ही इमारत पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. याला सर्वस्वी पालिका जबाबदार असून कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता प्रशासन केवळ नजरेने धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करत असते.
प्रभाग समितीनिहाय त्यांची वर्गवारी केली जाते. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सी १, सी २, अ सी २, ब सी ३ अशा प्रकारे याद्या प्रसिद्ध केल्या जातात.
दरम्यान, दोन वर्षे झाली, तरी आजही या इमारतीचे अवशेष पडून आहेत.जवळपास तीन पिढ्यांचा रहिवास पाहिलेल्या पसिरातील काही इमारती जुन्या ठाण्याची आठवण म्हणून आपल्या नशिबाला कोसत उभ्या आहेत. शासन / प्रशासन मात्र अशा भाडेकरूयुक्त खासकरून नौपाड्यातील मूळ ठाणेकरांचा रहिवास असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत अनुकूल नाही. त्यामुळे आता पुनर्वसन केव्हा होणार, याच प्रतीक्षेत आता या जुन्या इमारती उभ्या असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी महेंद्र मोने यांनी दिली.

Web Title:  Krishna residence is waiting for redevelopment even after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.