कामगार न्यायालयाचे एसटी कामगारांना हजर राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 10:11 PM2021-11-13T22:11:52+5:302021-11-13T22:13:01+5:30
ठाणे विभागीय कार्यालयाने १४० जणांना बजावल्या नोटिसा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागु करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरु न ३ टक्के मान्य केलेल्या तारखे पासून लागू करावेत
ठाणे : मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी ठाणे विभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची तीव्रता अधिक वाढत आहे . असे असतांना कामगार न्यायालयाने सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे ठाणे विभागीय कार्यालयाकडून देखील १४० कर्मचाऱ्याना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागु करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरु न ३ टक्के मान्य केलेल्या तारखे पासून लागू करावेत तसेच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागु केलेला घरभाडे भत्ता सुधारीत दराने लागु करावा या कृती समितीच्या मागण्या दिवाळी पुर्वीच प्रशासनाने बेमुदत उपोषण केल्या मुळे मान्य केलेल्या आहेत.परंतु कर्मचारी हे विलिणीकरण च्या मुद्यावर ठाम असुन गेले काही दिवसापासुन कडकडीत संपावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील आठ आगारातील सुमारे दोन हजार 700 कर्मचारी या संपत सहभागी झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या सलग सहा दिवसापासून सुरू असलेल्या या संपामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यात आता, कामगार न्यायालयाने देखील सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे ठाणे विभागीय कार्यालयाकडून देखील १४० कर्मचाऱ्याना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.