जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ५४ स्पेशालिस्ट डॉक्टरांचा अभाव; रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:41+5:302021-03-14T04:35:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शासनाचे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १३ रुग्णालये आहेत. यामध्ये जिल्हा सामान्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शासनाचे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १३ रुग्णालये आहेत. यामध्ये जिल्हा सामान्य रुगणालयांसह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि मध्यवर्ती रुग्णालयांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैद्यकीय अधिकारी, विविध आजारांचे स्पेशालिस्ट डॉक्टर आदी १५४ जणांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मंजूर आहेत. यापैकी वर्षानुवर्षांपासून ५४ तज्ज्ञ व स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या जागा आजपर्यंत रिक्त आहेत. या गैरसोयीमुळे जिल्ह्यातील रुणांचे अतोनात हाल होत आहेत.
जिल्ह्यातील या रुणालयांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांसह शस्त्रक्रियेसाठीचे बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टर, नाक, कान, घसातज्ज्ञ, मनोविकृतीतज्ज्ञ, नेतचिकित्सक, क्षयरोग आणि चर्मरोगतज्ज्ञ आदी स्पेशालिस्ट डॉक्टरांचा अभाव या सामान्य रुगणालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये आहे. वर्षानुवर्षांपासून रिक्त असलेल्या या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पूर्ततेसाठी राजकारणांसह संबंधित यंत्रणाकडून खास प्रयत्न होत नसल्याचे निदर्शनात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील या गंभीर आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी नातेवाइकांना मुंबईसह अन्यत्र उपचार घ्यावे लागत आहे. तर काही रुग्णांचा मृत्यूही ओढवत आहे.
येथील दस्तुरखुद्द विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांसह शस्त्रक्रियेसाठीचे बधिरीकरणतज्ज्ञ डॉक्टर, नाक, कान, घसा तज्ज्ञ, मनाविकृतीतज्ज्ञ, क्षयरोग आणि चर्मरोगतज्ज्ञ आदी स्पेशालिस्ट डॉक्टर नाहीत. या रुग्णालयात १९ तज्ज्ञ डॉक्टरांची मंजुरी आहे. मात्र, केवळ नऊ तज्ज्ञ डॉक्टर आहेत. उर्वरित १० जागा आजपर्यंत भरलेल्या नाहीत. मीरा-भाईंदर या सामान्य रुग्णालयात १९ डॉक्टरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांच्या जागेला मंजुरी आहे. मात्र, या रुगणालयाची एकही जागा भरलेली नाही. टोकावडे, गोवेली, खर्डी येथील रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षकांची जागा वर्षानुवर्षांपासून रिक्त आहे.
...