कासा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता
By admin | Published: November 7, 2016 02:41 AM2016-11-07T02:41:40+5:302016-11-07T02:41:40+5:30
या तालुक्यातील डहाणू कॉटेज रुग्णालय आणि कासा उपजिल्हा रुग्णालय या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांची
शौकत शेख, डहाणू
या तालुक्यातील डहाणू कॉटेज रुग्णालय आणि कासा उपजिल्हा रुग्णालय या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांची, टेक्निशियन्सची रिक्त पदे, प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती तसेच नादुरुस्त रुग्णवाहीका यामुळे डहाणूची आरोग्य सेवा सलाईनवर आहे.
पालघर विधानसभेचे आमदार अमित घोडा यांनी शुक्र वारी कासा उपजिल्हा रु ग्णालयाची पाहणी केली. त्यामध्ये रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिका, प्रतिनियुक्तीवर गेलेले वैद्यकीय अधिकारी, या विषयावर डॉ. प्रसाद तरसे, डॉ मुकणे यांच्याशी चर्चा केली आदिवासी गोरगरीब जनतेला आवश्यक वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी मिळवून देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आप्पा भोये, डहाणू तालुका प्रमुख संतोष वझे, चारोटी उपसरपंच प्रणय मेहेर, महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, उपस्थित होते.
कासा उपजिल्हा रुग्णालयाला एकूण ८ आरोग्य केंद्र जोडण्यात आलेली आहेत. महामार्गालगतच्या या उपजिल्हा रुग्णालयाला एकूण ३ रु ग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्र त्यापैकी २ नादुरुस्त आहेत. एकाच रुग्णवाहिकेवर भार आहे. त्यामुळे नजिकच्या सोमटा केंद्रात असलेली रुग्णवाहिका कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कासा येथे वाहनचालक हे पद मंजूर नाही. कंत्राटी पद्धतीने ५ कामगार काम करीत असून त्यांचेही वेतन वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे कासा येथे इमारती आहेत. पण डॉक्टरांअभावी रूग्णसेवा सलाईनवरच आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयाला जनरल सर्जन नाही त्यामुळे एकही शस्त्रक्र ीया होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे.
डहाणूच्या दोन्ही रुग्णालयात मोठ्या आजारांवर शस्त्रक्र ीया होत नाहीत. दाखल केलेल्या रुग्णांना सिल्व्हासाचे विनोबा भावे रुगणालय किंवा बापू रूग्णालयात नेण्यात येते. त्यामुळे डहाणू, कासा येथील रूग्णालये असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.