रुग्णालयात शिशु कक्षाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:55 PM2019-01-29T22:55:28+5:302019-01-29T22:56:00+5:30

कुपोषित माता, बालकांचे हाल; घ्यावी लागते जव्हार नाहीतर नाशिकला धाव

Lack of infant orbit in the hospital | रुग्णालयात शिशु कक्षाचा अभाव

रुग्णालयात शिशु कक्षाचा अभाव

Next

मोखाडा : कुपोषण व बालमृत्यूमुळे चर्चेत राहणाऱ्या या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये नवजात शिशू कक्ष (एस.एन.सी.युनिट)ची व्यवस्था नसल्याने नुकत्याच जन्मलेल्या बाळांची परवड होताना दिसत आहे. 

तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या घरात असून त्यात २५९ गावांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यातील रुग्णांना हे रुग्णालय हा एकमेव आधार असून येथे गरोदर माता, प्रसूत माता व कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. येथील गावकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गरोदर मातांची आबाळ होते आणि परिणामी बालकांच्या सुदृढतेवर त्याचा परिणाम होतो. त्यातच एस.एन.सी.युनिट नसल्याने बºयाचदा येथील गोरगरिबांना आपल्या शिशूला घेऊन जव्हार कुटीर रुग्णालय किंवा नाशिक गाठावे लागते. मात्र, खिशात पैसे नसल्याने तेथे गेल्यावरही त्यांच्या पुढे रहायचे कुठे? व खायचे काय? असे प्रश्न निर्माण होतात. वेगवेगळ्या टेस्ट, औषधोपचार आणि प्रवास खर्च यामुळे आदिवासी पालकांचे कंबरडे मोडत असल्याने आरोग्य विभागाने हा विभाग सुरू करावा अशी मागणी आहे.

एस .एन .सी. युनिटची गरज नवजात व कमी वजनाच्या बालकांसाठी अत्यावश्यक आहे. त्या आभावी शिशू दगावतात. यामुळे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात तातडीने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा धरणे आंदोलन केले जाईल.
- नरेंद्र चौधरी, मोखाडा

लवकरच मोखाडा ग्रामीण रुग्णालयात एस.एन .सी. युनिटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- डॉ. महेश पाटील, अधिक्षक,
मोखाडा ग्रामीण रु ग्णालय

Web Title: Lack of infant orbit in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे