भारतात प्रचंड हुशारी मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव- दा.कृ. सोमण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 06:31 PM2017-12-08T18:31:25+5:302017-12-08T18:32:52+5:30
भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका.
डोंबिवली: भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका. भारतातील संशोधकाकडे प्रचंड हुशारी आहे. आपण चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवितो. आपल्या शास्त्रज्ञांनी ते यान पृथ्वीभोवती प्रथम फिरत ठेवले त्यामुळे त्याला उर्जा कमी लागली. त्यामुळे या मोहिमा कमी खर्चात पार पडल्या, असे मत खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती कल्याण (शिक्षण विभाग), रॉयल इंटरनॅशनल स्कूल व गणित विज्ञान मंडळ, कल्याण-डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दा.कृ सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सोमण म्हणाले, भारतात पूर्वी सुईदेखील उत्पादित होत नव्हते. अन्नधान्य आपण अमेरिकेकडून आयात करीत असू. तांदूळ दुकानात दिसत नसे. आम्ही दोन किलो तांदूळ घेण्यासाठी लांबच्या शहरात जात असे. हे सांगण्यामागे उद्देश विद्याथ्र्याना भारताची काय परिस्थिती होती हे सांगायचे आहे. आता शेती अपारंपारिक पध्दतीने केली जाते. आपल्या जनतेला अन्नधान्य पुरवून उर्वरित माल निर्यात केला जातो. एवढी क्षमता भारतात आज निर्माण झाली आहे. आपण चंद्रयान प्रथम सोडले आणि चंद्राच्या उत्तर ध्रुवात पाणी आहे हे सांगितले. हेच सांगण्यासाठी अमेरिकाला 3क् वर्ष लागली. ज्या ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले त्यांचे यान इस्त्रो ही संस्था सोडते. आईवडिलांनी मुलांना वाढदिवसाला पुस्तक भेट म्हणून द्यावे. कारण नारळीकर आणि गोवरीकर कदाचित तुमच्या घरात वाढत असतील, असे सांगितले