शाळांमध्ये शिक्षकांचीही कमतरता

By admin | Published: July 20, 2015 03:15 AM2015-07-20T03:15:06+5:302015-07-20T03:15:06+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांअभावी विद्यार्थी पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शिक्षकही अपुरे आहेत.

Lack of teachers in schools | शाळांमध्ये शिक्षकांचीही कमतरता

शाळांमध्ये शिक्षकांचीही कमतरता

Next

प्रशांत माने , कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांअभावी विद्यार्थी पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शिक्षकही अपुरे आहेत. यामुुळे काही शाळांमध्ये दाटीवाटीने विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिले जात असल्याने एक प्रकारे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
केडीएमसीच्या ७४ शाळांपैकी ९ शाळा पटसंख्येअभावी बंद कराव्या लागल्या आहेत. उर्वरित ६५ शाळांमध्ये सद्य:स्थितीला ११ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिकतात.
शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाणही योग्य असणे गरजेचे आहे. शिक्षकांची ३९२ पदे मंजूर केली आहेत. परंतु, आजघडीला यातील केवळ २७४ पदेच भरली आहेत. अद्याप ११८ पदे रिक्त आहेत.
माध्यमांचा विचार करता मराठी माध्यमाच्या ५१ शाळांसाठी २९२ पदे मंजूर असून त्यातील २१४ पदे भरली आहेत. हिंदी माध्यमाच्या ३ शाळांसाठी ३५ पदे मंजूर आहेत. मात्र, २२ शिक्षकच सध्या कार्यरत आहेत, तर ९ उर्दू शाळांसाठी ६५ पदे मंजूर असली तरी ३८ पदेच भरली आहेत. शिक्षकांच्या कमतरतेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून बल्याणी येथील बंदेअली खाँ शाळा याचे ताजे उदाहरण आहे. येथे शिक्षक अपुरे पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात दाटीवाटीने बसवून शिकविले जात आहे. विशेष बाब म्हणजे पदवीधर शिक्षक पदे ही भरलेली नाहीत. मागील वर्षी नियमाप्रमाणे ती भरणे आवश्यक होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघटनेचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, शिक्षण मंडळाचे ती भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पदे भरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Lack of teachers in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.