ठाण्यात सव्वादोन लाख अनधिकृत बांधकामे

By admin | Published: November 4, 2015 11:38 PM2015-11-04T23:38:15+5:302015-11-04T23:38:15+5:30

ठाणे महापालिकेतील आणखी ११ नगरसेवकांवर अशा प्रकारे कारवाईची टांगती तलवार कायम आहे. यामध्ये शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन आणि राष्ट्रवादीच्या चार

Lack of unauthorized constructions in Thane | ठाण्यात सव्वादोन लाख अनधिकृत बांधकामे

ठाण्यात सव्वादोन लाख अनधिकृत बांधकामे

Next

- अजित मांडके,  ठाणे
ठाणे महापालिकेतील आणखी ११ नगरसेवकांवर अशा प्रकारे कारवाईची टांगती तलवार कायम आहे. यामध्ये शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन आणि राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. २०१२ मध्ये ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांच्या विरोधात अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अनधिकृत बांधकामात प्रत्यक्ष सहभाग अथवा अनधिकृत बांधकाम पाडकामात अडथळा, आदींसह इतर तक्रारींच्या बाबतीत या ११ नगरसेवकांवर ठपका ठेवला आहे. त्यानुसार त्यांच्यावर देखील अशाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. यातील काही तक्रारींवर प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप तक्रारदार करीत आहेत. अतिक्रमण विभागाकडून प्रभागस्तरावरील अहवाल प्राप्त व्हावा यासाठी वारंवार स्मरणपत्र देण्यात आलेली असताना अहवाल देण्यात येत नसल्याची बाब समोर येत आहे.
आजच्या घडीला शहरात २ लाख २४ हजार ७०३ अनधिकृत बांधकामे असून त्यात ५३४२ इमारतींचा समावेश असल्याचे पालिकेची आकडेवारी सांगते. तर मागील वर्षभरात केलेल्या कारवाईत जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत ५ हजार ९५९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ठाण्याला अनधिकृत बांधकामांची समस्या भेडसावत आहे. याच अनधिकृत बांधकामांमुळे मागील २० वर्षात १७५ जणांचा नाहक बळी गेला असून १३७ जण जखमी झाले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत क्लस्टरची योजना पुढे आली असली तरी तिची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आजही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. दरम्यान आजघडीला शहरात २ लाख २४ हजार ७०३ अनधिकृत बांधकामे असून यामध्ये १९९५ पूर्वीची १ लाख ७ हजार ५४२ आणि त्यानंतरची १ लाख १७ हजार १६१ बांधकामे आहेत. तर २ हजार पूर्वीची २ हजार २९३ बांधकामे आहेत. दरम्यान सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणांचाही सर्व्हे केला असून यामध्ये शासनाच्या जागेवर १९ हजार ८११, एमआयडीसी २५ हजार ६३०, वनविभाग १३ हजार ८२४ बांधकामांचा समावेश आहे. (संबंधित वृत्त पान ५ वर)

अनधिकृत इमारतींचा तपशील
पालिकेच्या
२०१४ च्या आकडेवारीनुसार शहरात आजच्या घडीला ५३४२ अनधिकृत इमारती असून यामध्ये सर्वाधिक इमारती या मुंब्य्रात असून येथे १८६६, नौपाडा - ३९९, कोपरी - ७०, वागळे -१०४८, उथळसर - ५५२, कळवा -५३४, माजिवडा - मानपाडा - २९५, वर्तकनगर - २८७ इमारती आहेत.

मालमत्ता विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार...
ठाणे शहरात मालमत्ता कर विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात अधिकृत करदाते हे ९६ हजार १३१ असून अनधिकृत करदात्यांची संख्या ही २ लाख २८ हजार ९२२ एवढी आहे. त्यात १ लाख २३ हजार ७८० ही अनधिकृत बांधकामांची संख्या असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
या आकडेवारीवरुनच शहरातील अनधिकृत बांधकामांचा आलेख गेल्या काही वर्षात कसा वाढला याची दाहकता दिसून येते.
विशेष म्हणजे मुंब्रा भागात २१ हजार ७०९, कौसामध्ये १५ हजार १८३, शीळमध्ये ५२२४ आणि दिव्यात २६ हजार ८३० अनधिकृत मालमत्ताधारक असल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ मध्ये केलेल्या कारवाईचा तपशील
प्रभाग समितीकारवाई
रायलादेवी३६
नौपाडा१०१३
कोपरी१०४
वागळे७१
उथळसर२२
कळवा८६६
माजिवडा-मानपाडा२२३
मुंब्रा१७९८
वर्तकनगर११०२
लोकमान्य नगर ७२४
एकूण ५९५९

बांधकामांचा तपशील...
प्रभाग समितीबांधकामे
रायलादेवी ४७५४१
नौपाडा १०९६७
कोपरी ७३९२
वागळे ६७११
उथळसर १०३१०
कळवा ३४९९७
माजिवडा-मानपाडा२९३५६
मुंब्रा ४४७२९
वर्तकनगर ३७७००

Web Title: Lack of unauthorized constructions in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.