वाहतूककोंडी सोडवणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस
By admin | Published: April 29, 2017 01:37 AM2017-04-29T01:37:51+5:302017-04-29T01:37:51+5:30
मुंब्य्रातील वाहतूककोंडी सोडवणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋ ता आव्हाड यांनी केली आहे.
मुंब्रा : मुंब्य्रातील वाहतूककोंडी सोडवणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋ ता आव्हाड यांनी केली आहे.
मुंब्य्रातील रस्त्यावर वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरी वसाहतीमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ हा एकमेव प्रमुख रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा उभी करण्यात येणारी चारचाकी, दुचाकी वाहने, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले, प्रवाशांना उतरवण्यासाठी, बसवण्यासाठी कुठेही कशाही पद्धतीने उभ्या राहणाऱ्या रिक्षा तसेच बाइक रायडर्स यामुळे अमृतनगर ते कौसा या सुमारे एक किलोमीटर परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होते. यावर, तोडगा काढण्यासाठी स्वत:हून काही बाबी टाळण्याऐवजी स्थानिक नागरिक मात्र वाहतूककोंडीसाठी प्रशासन आणि राजकीय नेत्यांना दोष देण्यात धन्यता मानत आहेत. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी करणे बंद केले, तसेच रिक्षाचालकांनी कुठेही रिक्षा उभी करण्याबाबत मनाला आवर घातला आणि बाइक रायडर्सने स्वत:वर संयम ठेवला, तर येथील वाहतूककोंडी बऱ्यापैकी कमी होऊ शकते. स्थानिक नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे, यासाठी वाहतूककोंडी सोडवणाऱ्यास एक लाख रु पयांचे बक्षीस देण्याची घोषणा संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋ ता आव्हाड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)